esakal | "नहले पे दहला' : गरिबांसाठी ठाकरे सरकार करणार हे, वाचा

बोलून बातमी शोधा

uddhav thakrey

सत्तेत येताच मुख्यमंत्र्यांनी अनेक निर्णय घेण्याचा जणू सपाटाच लावला आहे. यापैकी एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे आता प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष स्थापन करण्याबाबचा आहे. विशेष म्हणजे, लवकरच याबाबत शासन निर्णय होणार असल्याची विश्‍वसनीय माहिती आहे.

"नहले पे दहला' : गरिबांसाठी ठाकरे सरकार करणार हे, वाचा
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर निर्णय घेण्याचा धडाका लावला आहे. मुंबईतील आरे कारशेडच्या कामाला स्थगिती देऊन त्यांनी जुन्या सरकारला जोरदार धक्‍का दिला. आता पुन्हा एका निर्णयाने ठाकरे सरकार भाजपवर कुरघोडी करण्याची तयारी करत आहे. 

सत्तेत येताच मुख्यमंत्र्यांनी अनेक निर्णय घेण्याचा जणू सपाटाच लावला आहे. यापैकी एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे आता प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष स्थापन करण्याबाबचा आहे. विशेष म्हणजे, लवकरच याबाबत शासन निर्णय होणार असल्याची विश्‍वसनीय माहिती आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एक पाऊल पुढे असल्याची चर्चा आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी मंत्रालयात मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाची स्थापना केली होती. यातूनच लाखो गरिबांना आरोग्य सेवा मिळाली होती. विधानसभा निवडणुकीनंतर मंत्रालयातील वैद्यकीय कक्ष बंद करण्यात आले होते. मात्र, माध्यमांनी हा विषय लावून धरल्यानंतर राज्यापालांच्या मध्यस्तीने हे कक्ष पुन्हा सुरू करण्यात आले होते, हे विशेष. आता भविष्यात असा निर्णय झाल्यास प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय केंद्र सुरू होईल. याचा ग्रामीण भागातील रुग्णांना लाभ घेता येणार आहे.

वाचा - आमदार साहेब, दारू प्यायला 500 रुपये द्या : अधिवेशनात पडसाद

फडणवीस सरकारनंतर महाविकास आघाडी स्थापन करून मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरे विराजमान झाले. गोरगरिबांच्या हितासाठी त्यांनी आरोग्य सुविधा देण्याची तयारी सुरू केली आहे. याअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष सुरू करण्याच्या सूचनेला उद्धव ठाकरे यांनी हिरवा कंदील दिला असून, यासंदर्भातील शासन निर्णय लवकरच निघणार आहे. 

प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष 
प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष सुरू करण्यासाठी डॉ. दीपक सावंत यांनी पुढाकार घेतला होता. आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी आपल्या कामाचा धडाका सुरू केला असून, त्यांच्याकडे शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी प्रस्ताव दिला आहे आणि प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय कक्ष सुरू करावा अशी विनंतीही केली आहे. या विनंतीला मुख्यमंत्री ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. 

अधिक माहितीसाठी - #NagpurWinterSession : शेतकऱ्यांसाठी भाजप पुन्हा आक्रमक