आदिवासी विद्यार्थ्यांचे "कुलूप ठोको' आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

नागपूर - सरकारच्या थेट लाभ हस्तांतरण योजनेचा (डीबीटी) निषेध करीत आदिवासी विद्यार्थ्यांनी वसतिगृहाला गुरुवार कुलूप ठोकले. आदिवासी विद्यार्थी संघ, ऑल इंडिया इंडिजिनस स्टुडंट्‌स फेडरेशनच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी हे आंदोलन राज्यातील पुणे, मुंबई, ठाणे विदर्भातील सर्व जिल्ह्यांतील आदिवासी वसतिगृहांत केले. 

आदिवासी विभागाच्या वतीने थेट लाभ हस्तांतरण अंतर्गत 5 एप्रिल 2018 रोजी सरकार निर्णय जारी करण्यात आले आहे. या निर्णयामध्ये पुढील सत्रापासून राज्यातील आदिवासी शासकीय वसतिगृहातील खानावळ बंद करून विद्यार्थ्यांना भोजन व्यवस्थेकरिता थेट पैसे देण्यात येणार आहेत. दीनदयाल योजनेप्रमाणे वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना सरकार थेट शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता व निवासाकरिता रक्कम देणार होते. मात्र, या योजनेचे पैसे सरकारने विद्यार्थ्यांना वेळेवर उपलब्ध करून दिले नाही. सरकारने "डीबीटी'अंतर्गत वसतिगृहाची भोजन व्यवस्था बंद केल्यास विद्यार्थी ऐन शैक्षणिक सत्रात भोजन व निवासाची व्यवस्था कशी करणार? असा प्रश्‍न आंदोलनकारी आदिवासी विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे या निर्णयाच्या विरोधात संताप व्यक्त होत आहे. 

Web Title: adivasi students lockup movement