संग्रामपूरमधील अतिक्रमित जमीन घेणार मोकळा श्वास

पंजाबराव ठाकरे
गुरुवार, 26 एप्रिल 2018

संग्रामपूर (बुलढाणा) : तालुक्यातील मारोड ग्रामस्थांना शासनाचे पाठबळ मिळाल्याने या गावातील अतिक्रमित अकरा एकर जमीन मोकळा श्वास घेणार आहे.

याच जमिनीवर ग्रामस्थ श्रम दानातून पाणी संचयचे काम करणार असल्याची माहिती 25 एप्रिल रोजी तहसीलदार याचे दालनात समोर आली आहे. गावागावांत अशा शासकीय जमिनी अतिक्रमणात अडकून असल्याने प्रशासनाला ही कामे करताना मोठ्या अडचणीचा सामना करण्याचा प्रसंग येत असतात. यासाठी जिल्हा अधिकारी यांनी ग्रामीण भागातील रेकोर्ड नुसार तपासणी करून शासकीय जमिनीवरील अतिक्रमण दूर करण्याची मोहीम हाती घेणे गरजेचे दिसत आहे.

मारोड गावात गेल्या 14 दिवसांपासून नागरिक श्रमदान करून पाणी अडवणे आणि जिरवण्याचे स्रोत कष्टाने करीत आहेत. याच गाव शिवारात 122 गट न असलेले पडीक शेत गायरान म्हणून शासकीय रेकोर्डला नोंद आहे. या शेतावर कामे करीत असताना गावातील एक आणि गावाबाहेरील एक असे दोन लोकांनी या शेतावर ताबा असल्याचे सांगून  कामे करू नका असे सांगितले. त्याच संदर्भात पोलीस स्टेशनला तक्रारही दिली.

तक्रारीनुसार 25 एप्रिल रोजी तामगाव पोलीस स्टेशनला काही लोकांना बोलावण्यात आले होते. गाव करी ते राव ना करी या नुसार गावातील जवळपास सर्व  नागरिक पोलीस स्टेशनला आले व सर्व प्रकार कथन करून तहसीलदार यांना निवेदन दिले.

ठाणेदार आणि तहसीलदार यांनी चर्चा करून हा विषय गंभीरतेने हाताळत पाण्यासाठी शासन अतोनात प्रयत्न करीत असताना असे काही लोक खोडा घालीत असल्याचे समोर आले.

यावर तहसीलदार राठोड यांनी मारोडवासियांना कामे करण्यासाठी प्रशासन तुमचे सोबत असून शासकीय जमिनीवर पाणी अडविण्याचे काम सुरू ठेवा असे पाठबळ दिले.

या पाठबळाने या ग्रामस्थांमध्ये बळ आले असून श्रम करण्याला गती देण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. अतिक्रमण ही समस्या गावागावांत सतावणारी असल्याने जिल्हा प्रशासनाने यामध्ये लक्ष घालून प्रत्येक गावात अतिक्रमण मुक्तचे अभियान राबवावे अशी मागणी या निमित्ताने केली जात आहे.

Web Title: Administration backs villagers in land encroachment dispute