बेपत्ता अदनानचा आई घेेतेय शोध

Adnan-Kureshi
Adnan-Kureshi

नागपूर - नाला पार करताना वाहून गेलेल्या आठ वर्षीय अदनानचा पाच दिवसांनंतरही मृतदेह सापडला नाही. पोलिस व अग्निशमन दलाने तीन दिवस शोध घेतल्यानंतर आशा सोडली. मात्र, अदनानची आई मरजीना हिने धीर न सोडता नातेवाइकांसह मुलाचा मृतदेह शोधण्यास सुरुवात केली आहे. ती वेड्यासारखी सकाळीच उठून नाल्याच्या पात्राने मुलाचा शोध घेत आहे.

अदनान शकील कुरेशी (८, रा. गरीब नवाजनगर, यशोधरानगर) हा मोठा भाऊ अरमान व काही मित्रांसह मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता मैदानावर खेळायला गेला होता. ११.३० वाजताच्या सुमारास सर्व जण घराकडे परतत होते. पाऊस येत असल्याने वनदेवीनगर, पिवळी नदीजवळील नाला भरभरून वाहत होता. 

त्यामुळे सर्व थांबले. मात्र, अदनान उत्सुकतेपोटी पळत सुटला. पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने अदनान वाहत गेला. त्यामुळे मुलांनी आरडाओरडा केला. तेथून जात असलेल्या उमेश नावाच्या युवकाने नाल्यात उडी घेतली. अदनानला वाचविण्याचा प्रयत्न केला.

 मात्र, नाल्यात उडी घेतल्यामुळे तो जखमी झाला. अदनानचा हात उमेशच्या हातून सुटून वाहत गेला. त्याचा शोध अग्निशन दल व पोलिसांनी घेतला. मात्र, न सापडल्याने अग्निशमन दलाने शोध थांबविल्याचा आरोप मरजीना कुरेशी यांनी केला आहे.

बॉलने केला घात
पुराच्या पाण्यात अदनानला प्लॅस्टिक बॉल वाहताना दिसला. बॉल पकडण्याच्या नादात तो प्रवाहाच्या दिशेने पळाला. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने अदनान वाहून गेला. बॉलने अदनानचा घात केला.

जोपर्यंत मुलगा मृतदेह सापडत नाही, तोपर्यंत शोध घेईल. गावकरी व नातेवाईक सोबत असल्याने रात्रीचा दिवस करीत मुलाचा शोध घेईल. मुलगा सापडेपर्यंत मृत झाल्याचे मानणारसुद्धा नाही.
- मरजीना कुरेशी, अदनानची आई.

 अदनान कुरेशी हा वाहून गेल्यानंतर एकाही नगरसेवकाने तसेच आमदाराने कुरेश कुटुंबीयांकडे फिरकूनही पाहिले नाही. संवेदनाहीन पुढारी झाले आहेत. मात्र, गावकरी आणि नातेवाईक खंबीरपणे पाठीशी आहेत. सरकारनेसुद्धा दखल घेतली नाही. त्यामुळे सोमवारी आंदोलन करण्यात येईल.
- शहजाद खान, अदनानचे मामा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com