ग्राहकांना दिला जातोय धोका; भेसळयुक्त तंबाखू खर्रा झाला कमाईचे साधन

दिलीप गजभिये
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

खापरखेडा, (जि. नागपूर) : ग्रामीण व शहरी भागात पानसुपारी शिवाय घराबाहेर जाऊ न देण्याचा रिवाजच महाराष्ट्रात आहे. पूर्वी पानाचे विडे बनवून देण्यात येत होते. मात्र, आजच्या आधुनिक युगात बदलत्या परिस्थितीत पानाची जागा आता प्लॅस्टिकच्या पन्नीत बनविलेल्या खर्ऱ्याने घेतली आहे. विश्‍वासाने खरेदी केला जाणारा खर्रा मात्र विक्रेते बनावटी व भेसळयुक्त तंबाखू टाकून तयार केला जात असल्याचे चित्र सर्वत्र दिसू लागले आहे. 

खापरखेडा, (जि. नागपूर) : ग्रामीण व शहरी भागात पानसुपारी शिवाय घराबाहेर जाऊ न देण्याचा रिवाजच महाराष्ट्रात आहे. पूर्वी पानाचे विडे बनवून देण्यात येत होते. मात्र, आजच्या आधुनिक युगात बदलत्या परिस्थितीत पानाची जागा आता प्लॅस्टिकच्या पन्नीत बनविलेल्या खर्ऱ्याने घेतली आहे. विश्‍वासाने खरेदी केला जाणारा खर्रा मात्र विक्रेते बनावटी व भेसळयुक्त तंबाखू टाकून तयार केला जात असल्याचे चित्र सर्वत्र दिसू लागले आहे. 
सद्याच्या परिस्थितीत घरी आलेल्या पाहुण्यांना सोपसुपारी देण्याऐवजी खिशातील खर्रा काढून स्वतःही आणि ज्यांच्याकडे जातात त्यांनाही देतो. तेसुद्धा पाहुण्यांना खर्रा 120 का किंवा बाबुल असे विचारून खर्ऱ्याचा आनंद लुटतो. गेल्या अनेक दिवसांपासून पानटपरीवर पान खाणाऱ्या शौकिनांपेक्षा खर्रा खाणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. पाच ते वीस रुपयांपर्यंत मिळणारे पान एक व्यक्ती एकाच वेळी खातो. मात्र, पानाऐवजी 10 ते 30 रुपयांचा एक खर्रा एक व्यक्ती दिवसभर खातोच शिवाय दुसऱ्यांनाही देऊ शकतो. याचमुळे "कम पैसेमे बम आवाज' असलेल्या खर्ऱ्याचे शौकीन वाढले आहे. 
महाराष्ट्रात सुगंधित तंबाखू खर्ऱ्यावर बंदी घालून त्यावर नियंत्रण मिळविण्यात सरकार सपेशल अपयशी ठरले आहे. आजही सुगंधित तंबाखूचा खर्रा सर्रास कुठेही मिळतो, अगदी किराणा दुकानातही!. यावरून बंदीच्या कायद्याची वाट लागली असल्याचे चित्र सर्वत्र आहे. जेव्हा कायदा पायदळी तुडवून नफा कमवायचा असेल तर कायद्याचे पालन कोण करणार? असा प्रश्न सर्वच करीत आहेत. याचमुळे विक्रेतेही यात हमखास भेसळ करीत आहेत. आपल्या ग्राहकांच्या आरोग्यावर अशा भेसळयुक्त तंबाखूमुळे विपरीत परिणाम होतील याचाही विचार विक्रेतेदेखील करीत नाहीत. यामुळे ते व्यवसायातून ग्राहकांना धोका देत असल्याचे मत काही ग्राहकांनी व्यक्त केले. यापूर्वी गुटख्याची, खर्ऱ्याची विक्री पानठेल्यापर्यंत सीमित होती, मात्र सध्या वेगवेगळ्या दुकानांमध्ये दिसू लागली आहे. 

अल्पवयीन मुलांमध्येही व्यसन 
खर्रा खाऊन कुठेही, भिंतीवर थुंकल्याचे निदर्शनास येते. महिला व बालकांमध्येसुद्धा खर्रा खाण्याचे प्रमाण अधिक दिसते. तर मजुरी करणाऱ्या महिलासुद्धा कामावर जाताना सोबत खर्रा घेऊन जातात. दिवसभर तोंडात टाकून काम करतात तसेच अल्पवयीन मुलांमध्येसुद्धा खरा खाण्याचे वेड लागले असून पालकांमध्ये हा चिंतेचा विषय ठरला आहे. आज जास्तीत जास्त व्यसनाधीन व्यसनाच्या अधीन राहून सामान्य नागरिकांत भीतीचे सावट पसरले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Adulterated tobacco is a true monetization tool