प्रगत तंत्रज्ञान शेतीपर्यंत पोचवा - मुख्यमंत्री फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 एप्रिल 2018

नागपूर - कृषी क्षेत्रात उत्पादकता आणि उत्पादन वाढविण्यासाठी उपलब्ध प्रगत तंत्रज्ञान शेतीपर्यंत पोहोचविणे आवश्‍यक आहे. कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठी प्रशिक्षणाची आवश्‍यकता ‘वनामती’ ही संस्था पूर्ण करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला.

नागपूर - कृषी क्षेत्रात उत्पादकता आणि उत्पादन वाढविण्यासाठी उपलब्ध प्रगत तंत्रज्ञान शेतीपर्यंत पोहोचविणे आवश्‍यक आहे. कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठी प्रशिक्षणाची आवश्‍यकता ‘वनामती’ ही संस्था पूर्ण करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला.

वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती) येथील ‘वसंतराव नाईक स्मृती सभागृहा’चे  उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, खासदार अनिल महात्मे, आमदार सुधाकर देशमुख, प्रकाश गजभिये, गिरीश व्यास, अप्पर मुख्य सचिव विजय कुमार, विभागीय आयुक्त अनूप कुमार, वनामतीचे संचालक रवींद्र ठाकरे, वरिष्ठ प्रशासन अधिकारी सुवर्णा पांडे आदी यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री  म्हणाले, की विदर्भाचे सुपुत्र व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी दूरदृष्टीने शेती व जलसंधारण क्षेत्रात बहुमोल कार्य केले. परंतु त्यानंतर याकडे दुर्लक्ष झाले. राज्य सरकारच्या महत्वकांक्षी जलसंधारण योजनेमुळे रब्बीचे उत्पादन वाढले असून शेतकरी फळबागांकडे वळला आहे. प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वनामतीच्या सुसज्ज अशा वसंतराव नाईक सभागृहाच्या कोनशिलेचे अनावरण करुन उद्घाटन केले. रवींद्र ठाकरे यांनी प्रास्ताविक माजी संचालक विजय घावटे, गिरीष मानापुरे, अभियंता सुरेश बोरीकर, कलावंत नीलेश इंगळे यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

‘कृषी मोबाईल ॲप’चे विमोचन
महाराष्ट्रात ‘जलयुक्त शिवार योजना’ यशस्वीरित्या राबविल्यामुळे भुगर्भातील पाण्याची पातळी वाढली आहे. दुष्काळी परिस्थिती असलेल्या मराठवाडयात देखील गाळयुक्त अभियानामुळे पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. यावेळी कृषी सहाय्यकांनी तयार केलेल्या ‘कृषी मोबाईल ॲप’चे विमोचनही मुख्यमंत्र्यांनी केले. 

राज्याला मोठ्या धरणापेक्षा जलसंधारणाची गरज आहे. ही संकल्पना वसंतराव नाईक यांनी त्याकाळी रुजविली होती. दूरदृष्टी ठेवून त्यांनी जनसामान्यांकरिता कार्य केले आहे.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

Web Title: Advanced Technology agriculture devendra fadnavis