
अमरावती : एकतर्फी प्रेमप्रकरणातून दोघांमधील वाद विकोपाला गेल्याच्या बऱ्याच घटना घडतात. त्यातून काहीच निष्पन्न होत नाही. याची कल्पना असतानाही अनेक युवक प्रेमासाठी वाट्टेल ते करायला तयार होतात. तोही त्यापैकीच एक निघाला. एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या नकारानंतरही तो तिला म्हणाला तू माझीच गर्लफ्रेंड...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक अल्पवयीन मुलगी भावनेष रवींद्र कंटाळे (वय २३, रा. बाभळी) याच्या प्रेमाला होकार देत नव्हती. बरेच प्रयत्न केल्यानंतरही अपयश येत होते. परंतु, भावनेष प्रेमात बेभान झाला होता. तिच्या होकारासाठी त्याने कशाचाही विचार न करता थेट तिचे घर गाठले. तिच्याजवळचा मोबाईल जबरीने हिसकावला व तिने संपर्क करावा यासाठी स्वत:चा मोबाईल नंबर दिला. अन् तिला फोन करण्यास सांगितले.
मुलीनेसुद्धा सहज म्हणून भावनेषच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून प्रेमास स्पष्ट नकार कळविला. त्यानंतर त्याने वारंवार तिच्या घरापर्यंत पाठलाग करून तिला गाठले. मैत्री करण्याबाबत तिचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. बळजबरीने तिचा हात पकडला असता, स्वत:ची सुटका करून घेतली. तिच्या होकारासाठी प्रयत्न करूनही यश न आल्यामुळे भावनेष चिडला.
आता त्याने ‘तू फक्त माझीच गर्लफ्रेंड आहे' असे सांगून होकार न दिल्यास बदनामी करण्याची धमकी दिली. अल्पवयीन मुलीने पालकांना भावनेषच्या त्रासाची कल्पना दिली. मुलीच्या तक्रारीवरून दर्यापूर पोलिसांनी युवकाविरुद्ध विनयभंग, ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. दर्यापूर ठाण्याच्या हद्दीत एका गावात ही घटना घडली.
मुलगी व पालक होते वैतागले
सततच्या त्रासामुळे मुलगी व तिचे पालक वैतागले होते. समजूत काढल्यानंतरही भावनेषच्या वर्तणुकीत फरक पडला नाही. त्यामुळे मुलीने तक्रार दिल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
- तपन कोल्हे,
पोलिस निरीक्षक, दर्यापूर ठाणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.