नागपुरात सहा वर्षांनंतरही सिमेंट रस्त्यांचा पसाराच

छायाचित्र
छायाचित्र

नागपूर ः शहरात सहा वर्षांपूर्वी सिमेंट रस्त्यांचे जाळे विणण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. मात्र, अजूनही पहिल्या, दुसऱ्या टप्प्यातील सिमेंट रस्ते पूर्ण झाले नसून तिसऱ्या टप्प्यातीलही केवळ 21 रस्त्यांचे काम सुरू आहे. संपूर्ण शहरात सिमेंट रस्त्यांच्या कामानिमित्त पसारा पडला असून कामाच्या संथगतीमुळे प्रवासादरम्यान कोंडी होत असल्याने नागपूरकर संताप व्यक्त करीत आहेत.

शहरात मोठ्या प्रमाणात सिमेंट रस्ते तयार झाले आहेत तर काही सिमेंट रस्त्यांचे काम अद्यापही सुरू असून रस्त्यांचे खोदकाम करून ठेवण्यात आले आहे. सिमेंट रस्त्यांच्या यादीत असल्यामुळे अनेक रस्त्यांवर खड्डे पडले असले प्रशासनाकडून ते बुजविले जात नाही. परिणामी चाळणी झालेल्या रस्त्यांवरून वाहनधारकांना वाहने चालविताना सर्कस करावी लागत आहे. 2013 मध्ये महापालिकेने सिमेंट रस्त्यांच्या पहिल्या टप्प्याची घोषणा केली. पहिल्या टप्प्यातील 30 किमीच्या रस्त्यांपैकी अद्यापही 10 किमी रस्त्यांची कामे झाली नाहीत. ही कामे पूर्ण होण्यापूर्वीच 2014 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिमेंट रस्त्यांच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा केली होती. 23 मे 2016 मध्ये तिसऱ्या टप्प्याच्या 300 कोटींच्या सिमेंट रस्त्यांचीही घोषणा तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी केली होती.

पहिल्या टप्प्यातील 10 किमीचे रस्ते अद्यापही झाले नाहीत. कंत्राटदार कंपनीने अर्धवट काम सोडल्यानंतर महापालिकेने नवीन कंत्राटदाराच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली. स्थायी समितीपुढेही याबाबतचा प्रस्ताव ठेवण्यात आला. दुसऱ्या टप्प्यातील 59 विविध रस्त्यांपैकी 49 झाले असून दहा रस्त्यांची कामे अद्यापही सुरू असल्याचे महापालिकेतील सूत्राने नमूद केले. तिसऱ्या टप्प्यातील 39.53 किमीच्या रस्त्यांपैकी 21 किमीच्या रस्त्यांची कामे सुरू आहेत. विशेष म्हणजे यातील अनेक रस्त्यांची कामे अर्धवट आहेत. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील सिमेंटीकरणाच्या यादीत असलेल्या रस्त्यांची डागडुजीही केली जात नाही. त्यात तिसऱ्या टप्प्यातील कामासाठी अनेक रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. एकीकडे उड्डाणपूल आदीमुळे नागरिक, वाहनधारकांना दररोज मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यात रस्त्यांच्या संथगतीमुळे नागरिकांना डोकेदुखी झाली आहे.


महापौरही संतप्त
काही ठिकाणी रस्त्याच्या एका बाजूचे काम पूर्ण झाले. मात्र अनेक महिने लोटूनही दुसऱ्या बाजूच्या कामाला सुरुवात झाली नसल्याने महापौर नंदा जिचकार यांनी बुधवारी तीव्र संताप व्यक्त केला. त्यांनी सिमेंट रस्त्यांच्या त्रुटीवरही बोट ठेवले. तयार झालेल्या रस्त्यांवरून वाहणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी तर काही ठिकाणी झाडांसाठी आवश्‍यक जागा सोडण्यात आली नसल्याने लवकरात लवकर त्रुटी दूर करून उर्वरित सिमेंट रस्त्यांच्या कामाला गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

सिमेंट रस्त्यांची स्थिती
फेज किंमत किमी झालेली कामे (किमी)
1 150 कोटी 30 20
2 290 कोटी 59 49
3 301 कोटी 39.53 21 किमी रस्त्यांची कामे सुरू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com