esakal | युवक काँग्रेसचे ‘सुपर 60’च्या धर्तीवर आता ‘सुपर 1000’
sakal

बोलून बातमी शोधा

youth congress

युवा जोडो अभियान राज्यभरात सर्वत्र सुरू आहे. या युवा जोडो अभियानाचे समन्वयक जिल्हाभरात युवक काँग्रेसची विचारधारा मान्य असलेले तसेच काँग्रेस विचारधारेत काम करण्याची आवड असलेल्या तरुणांशी संपर्क करून त्यांची मते जाणून घेऊन त्यांना युवक काँग्रेसमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध करून देतील.

युवक काँग्रेसचे ‘सुपर 60’च्या धर्तीवर आता ‘सुपर 1000’

sakal_logo
By
मनोज भिवगडे

अकोला : विधानसभा निवडणूक काळातील ‘सुपर 60’ अभियानाच्या यशानंतर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने ‘सुपर 1000’ अर्थातच ‘युवा जोडो अभियाना’चे रणशिंग फुंकले आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रवक्ते कपिल ढोके यांनी दिली. 

हेही वाचा - मंत्र्याच्याच सत्कार समारंभात मारला होता डल्ला, झाले गजाआड

युवा जोडो अभियानांच्या माध्यमातून आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या व काँग्रेस विचारधारेत काम करण्यास उत्सुक असलेल्या युवतींना पक्षांमध्ये काम करण्याची संधी देऊन त्यातील एक हजार युवक व युवतींना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये संधी देण्याचे काम युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वात केले जाणार आहे.

क्लिक करा - बच्चू कडू इन ॲक्शन; अधिकाऱ्यांवर कारवाईचा धडाका

युवा जोडो अभियान राज्यभरात सर्वत्र सुरू आहे. या युवा जोडो अभियानाचे समन्वयक जिल्हाभरात युवक काँग्रेसची विचारधारा मान्य असलेले तसेच काँग्रेस विचारधारेत काम करण्याची आवड असलेल्या तरुणांशी संपर्क करून त्यांची मते जाणून घेऊन त्यांना युवक काँग्रेसमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध करून देतील. 

काँग्रेस पक्ष हा लोकशाही विचारांचा पुरस्कार करणारा पक्ष आहे. विविध क्षेत्रात काम करणारे तरुण राजकीय अंगाने काँग्रेसमध्ये काम करण्यासाठी उत्सुक आहेत. अशा युवकांनी युवा जोडो अभियानचे समन्वयक व राज्य प्रवक्ते कपिल ढोके त्याचप्रमाणे प्रदेश सचिव सागर कावरे, निनाद मानकर, अकोला ग्रामीण युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश गणगने, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंशुमन देशमुख यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. जे तरुण काँग्रेसमध्ये काम करण्यास उत्सुक असतील त्यांना प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे हे स्वतः भेटून पक्षात काम करण्याची संधी देतील. अशा पद्धतीने आगामी काळात युवा जोडो अभियानांच्या माध्यमातून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचा ‘सुपर 1000’ हा युवक व युवतींना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रतिनिधत्व देणारा उपक्रम राज्यभरात सुरू आहे, अशी माहिती देत काँग्रेसमध्ये काम करण्यास उत्सुक असलेल्या युवक व युवतींनी संपर्क करण्याचे आवाहन सुद्धा कपिल ढोके यांनी केले आहे.