मंत्र्यांच्याच सत्कार समारंभात मारला होता डल्ला; झाले गजाआड

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 26 January 2020

देऊळगावराजा व सिंदखेडराजा येथील सत्कार सोहळ्यातही काही व्यक्तींच्या सोन्याच्या साखळ्या चोरीला गेल्या होत्या. यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेंद्र देशमुख यांनी एक पथक तयार करून या तपासकामी लावले होते. 

बुलडाणा : जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या बुलडाणा, सिंदखेडराजा व देऊळगावराजा येथील सत्कार सोहळ्यातून सोन्याची साखळी चोरणारे चोरटे स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकले आहे.

बुलडाणा येथे 19 जानेवारीला डॉ. शिंगणे यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. यामध्ये चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेऊन नगरपालिका माजी उपाध्यक्ष विनोद बेंडवाल यांच्या गळ्यातील 1 लाख 88 हजारांची सोन्याची साखळी लंपास केली होती. यासह देऊळगावराजा व सिंदखेडराजा येथील सत्कार सोहळ्यातही काही व्यक्तींच्या सोन्याच्या साखळ्या चोरीला गेल्या होत्या. यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेंद्र देशमुख यांनी एक पथक तयार करून या तपासकामी लावले होते. 

हेही वाचा - #Republic day 2020 : तिरंग्याच्या खाली एकवटण्याची गरज : बच्चू कडू

बसस्थानकावरच पकडले
या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार, हे चोरटे शुक्रवार (ता.24) बुलडाणा बसस्थानकावर आल्याचे कळाले. यावरून पोलिसांनी नेव्हीन संजय माने (वय 20, रा. नाथनगर, पाथर्डी ह.मु. अहमदनगर) व रमेश शंकर जाधव (वय 25, रा. गांधी नगर, बीड) यांना ताब्यात घेतले. त्यांना पोलिसांनी सातवे रत्न दाखविताच गर्दीचा फायदा घेऊन आपण सोन साखळ्या लंपास केल्याचे कबूल गेले. पथकामध्ये पोलिस उपनिरीक्षक मुकूंद देशमुख, अताउल्ला खान, रघुनाथ जाधव, विजय दराडे, विजय वारुळे, श्रीकांत चिंचोले, अमोल अंभोरे, राहुल बोर्डे हे सहभागी होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: local crime branch arrested steal gold chains thieves

Tags
टॉपिकस
Topic Tags: