कोरोनावर देश गंभीर; मात्र हे अधिकारी नाही

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 April 2020

कुठल्याही प्रकारची शहरात नगरपंचायतकडून जनजागृती करण्यात येत नसल्याने कोरोना विषयी माहिती नागरिकांपर्यंत पोहोचत नसल्याचे पहायला मिळत आहे. शहरात जर कुणीही कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आला तर त्याची जबाबदारी मुख्याधिकारी स्नेहल राहाटे यांच्यावर असेल असा आरोप सर्वपक्षीय नगरसेवकांनी करून राहाटे यांची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली असून, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

बार्शीटाकाळी (जि. अकोला) : कोरोना महामारीने जगभरात थैमान घातले. सर्वंच ठिकाणी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, बार्शीटाकळी नगर पंचायतच्या मुख्याधिकारी या कोरोनाबाबत गंभीर नसल्याचे पुढे आले आहे. यासंदर्भात सर्वपक्षीय नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार देत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. देशाला सध्या कोरोनाची पार्श्‍वभूमी आहे.

हेही वाचा- अकोला येथे आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह, दुसरा अकोट फैलातील

कारवाईची कोली मागणी
कोरोनाचा संसर्ग वाढू नये, याकरिता लॉकडाउन करण्यात आले. शासनाकडूनही नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, बर्शीटाकळी नगर पंचायत कोरोनाबाबत गंभीर दिसत नाही. कुठल्याही प्रकारची शहरात नगरपंचायतकडून जनजागृती करण्यात येत नसल्याने कोरोना विषयी माहिती नागरिकांपर्यंत पोहोचत नसल्याचे पहायला मिळत आहे. शहरात जर कुणीही कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आला तर त्याची जबाबदारी मुख्याधिकारी स्नेहल राहाटे यांच्यावर असेल असा आरोप सर्वपक्षीय नगरसेवकांनी करून राहाटे यांची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली असून, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

निवेदनावर नगरसेवक लइका खान सरफाराज खान, नुसरत जमाल, सैयद मुजफ्फर, शाबान परवीन, सैयद अशफाक, इफ्तेखार काजी, बबलू काजी, श्रावण भातखडे, सैयद जहाँगीर, सुनील सिरसाट, अब्दुल अकील अब्दुल अजीज, ॲड. विनोद राठोड, अर्शद खान अंसार खान, मनीषा बोबडे, मिनाताई राऊत, छाया साबळे, जयश्री वाटमारे, हसन शाह, सुरेश जामनिक, नसीम खान, कमलाबाई, शंकर धुरंधर यांच्यासह सर्व नागरसेवकांच्या स्वाक्षरी आहेत.

शासनाच्या निर्देशाप्रमाणे होत आहेत कामे
बर्शीटाकळी नगरपंचायत अंतर्गत कोरोना विषय जनजागृती, सोशल डिस्टन्सिंग, फवारणी व शासनाच्या निर्देशाप्रमाणे काम करीत आहे.
-स्नेहल रहाटे, मुख्याधिकारी, नगरपंचायत, बर्शीटाकळी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Against the backdrop of the Corona epidemic Chief executive officer Not serious