Aghori Rituals in Chandrapur Exposed
esakal
चंद्रपूर : गुप्तधनाच्या आमिषाने कुमारिका आणि विधवा महिलांचा अघोरी पूजेसाठी वापर केला जात असल्याचे ‘सकाळ’ने उघडकीस आणताच एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची चौकशीसाठी शुक्रवारी (ता. १७) चंद्रपूर पोलिसांचे एक पथक सकाळीच सावली येथे दाखल झाले. वनविभागाच्या ताब्यातील आरोपींची या पथकाकडून चौकशी सुरू आहे. याप्रकरणात काही महिलाही मध्यस्थ म्हणून काम करीत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.