Superstition : अघोरीचा डाव फसला;तरुणांनी पुढाकार घेऊन गावकऱ्यांची भीती केली दूर

अंधश्रद्धा अजूनही कायमच असल्याचा प्रकार खेड्यातील एका घटनेवरून समोर आला.
Superstition
Superstitionesakal

संग्रामपूर : बदलत्या काळानुसार जुन्या काळच्या अघोरी, भानामती, करणी आदी प्रकार कालबाह्य झाले . तरी मात्र अंधश्रद्धा अजूनही कायमच असल्याचा प्रकार खेड्यातील एका घटनेवरून समोर आला.

Superstition
Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

तालुक्यातील पळशी झाशी येथील गावाबाहेरीलगावातील सार्वजनिक पाण्याची टाकीच पूजन करून कुणीतरी अघोरी विद्येचा प्रकार भासवण्याचा प्रयत्न केल्याचे 5 मे च्या सायंकाळी उजेडात आले.या मुळे गावातील नागरिक दहशती खाली येऊन सदर पाणी पिण्यास वापरावे की नाही असाही प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला. मात्र हा काही जादू बिदू चा प्रकार नसूनअंधश्रद्धा पसरविण्याचा भाग असल्याचे गावातीलच काही वैज्ञानिक दृष्टीकोण ठेवणाऱ्या तरुणांनी उघड केले. आणि गावकार्यामधील भीती दूर केली.

Superstition
Pune News : क्रिकेटच्या चेंडूने घेतला होतकरू खेळाडूचा बळी! अवघड जागी चेंडू लागल्यामुळे ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यु

घडलेला प्रकार असा की पाण्याच्या टाकीजवळ करणी चा प्रकार दिसावा अश्या पध्द्तीने एका काबीच्या टोपल्यात विशिष्ट प्रकारची पूजा मांडलेली होती. हे कृत्य भीतीदायक असल्याने याची गावभर चर्चा झाली. मात्र आजच्या युगात असा प्रकार म्हणजे शुद्ध अंधश्रद्धा च म्हणून गावातील 3 ये चार युवकांनी सदर पूजा मोडीत साहित्य फेकुन दिले. व कुणीही घाबरू न जाता अंधश्रद्धेला बळी पडू नका!

Superstition
IPO News Update : आधार हाऊसिंग फायनान्सच्या आयपीओसाठीचा प्राइस बँड निश्चित ; ग्रे मार्केटमध्ये शेअर्सची घोडदौड

असे आवाहन केले.

प्राप्त माहिती नुसार दिनांक ०५/०५/२०२४ ला पळशी झाशी गावात संध्याकाळच्या दरम्यान भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली होती .आणि त्याला कारण होतं ते,गावातील पाण्याच्या टाकीच्या जवळ एका विशिष्ट प्रकारच्या मांडलेल्या पुजेचे/करणीचे( एक काबीचे टोपले त्यात पिवळा कपडा त्यावर भात एक बिट्टीचा तुकडा आणि कणकेचे दोन गोळे त्याला लाल रंग लावलेला) अशा प्रकारचा एक प्रकार कुणी अज्ञात ने करून ठेवला होता. त्यावरून गावात कुतूहल व भीती असे दोन प्रकारचे वातावरण निर्माण झाले होते .त्यात कुतूहलापेक्षा भीतीच वातावरण जास्त निर्माण झाल होत.

ही माहिती मिळताच गावातील अभय मारोडे . वैभव तायडे, राहुल मेटांगे शिवा नंदकिशोर मारोडे, अनंता राहणे अशी बरीच तरुण मंडळी त्या घटनास्थळी गेले. त्या ठिकाणचा प्रकार बघितला.गावातील भीतीदायक वातावरण पाहता ती पूजा उचलून मोडून टाकली व गावाबाहेर नेऊन टाकून दिली.अशा प्रकारच्या करणीमुळे किंवा जादूमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये व गावकऱ्यांच्या मनात अंधश्रद्धेला वाव मिळू नये. गावकऱ्यांनी अशा कुठल्याही प्रकारच्या करणीला किंवा जादूटोण्याला भिक न घालता. अशा अंधश्रद्धेला हाणून पाडणे अपेक्षित आहे.असे आवाहनही गावातील त्या तरुणानी केले आहे.सदर पूजेचे टोपले खरंच करणी च्या उद्देशाने ठेवले असावे की इतर काही पारंपरिक विधी चा भाग असेल याबाबत साशंकता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com