प्राध्यापिका जळीत प्रकरणी हिंगणघाट येथे उफाळला जनआक्रोश; मृत्युदंडाची मागणी

hinganghat
hinganghat

हिंगणघाट : काल घडलेल्या अमानवीय घटनेचे पडसाद आज दिवसभर शहरात पाहायला मिळाले, सर्वपक्षीय मोर्चा असो की रास्ता रोको यात उस्फूर्तपणे महिला, शाळकरी मुलं, महाविद्यालयीन युवती यांनी घराबाहेर पडून मोर्चात आपला सहभाग नोंदविला, महामोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला येथे मोर्चेकरांचा संयम सुटला. त्यांनी पोलिसांनी बनलेली मानवी साखळी तोडून थेट उपविभागीय कार्यालयात धडक दिली, या समाजकंटकांला फासावर लटकवा ही एकमुखी मागणी आंदोलनकर्त्यांची केली, या मोर्चाचा आक्रोश पाहून प्रशासनही हादरले. याशिवाय दिवसभरात शहरात धरणे,निवेदन आणि रास्ता रोको सारख्या घटनांद्वारे नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.

शहरातील नंदोरी चौक परिसरात दारोडा येथील प्राध्यापिका तरुणीच्या अंगावर माथेफिरू विकेश नगराळे याने पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले व तो तेथून पसार झाला, त्याला चार तासाच्या आत पोलिसांनी बुटीबोरी जवळील टाकळघाट एमआयडीसी परिसरातून ताब्यात घेतले. पीडीत प्राध्यापिकेला नागपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेने समाजमन सुन्न झाले. घटनेचे पडसाद मात्र शहरात हळूहळू उमटू लागले ,महिलां आणि महाविद्यालयीन युवतीच्या संतप्त भावना पहावयास मिळाल्या. दरम्यान आज सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते, मोर्चात हजारोच्या संख्येने स्त्री पुरुष लहान मुले नागरिकांनी सहभाग नोंदविला, शहरातील प्रमुख मार्गाने फिरून मोर्चा उपविभागीय कार्यालयावर धडकला. यावेळी उपविभागीय अधिकारी चंद्रकांत खंडाईत यांनी स्वतः मोर्चेकऱ्यां समोर येत निवेदन स्वीकारले. या प्रकारच्या घटना वारंवार शहरात घडत आहे, काही दिवसापासून या शहरात अवैध धंद्यांना ऊत आला आहे, गुन्हेगारीत वाढ होत आहे परिणामी महिला वर्गात दहशतीचे व असुरक्षिततेचे वातावरण तयार झाले आहे, सर्वसामान्य नागरिक याचा त्रास सहन करत आहेत, शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर पावले उचलावी, अशी मागणी यावेळी निवेदनातून करण्यात आली. मोर्चात आमदार समीर कुणावार, माजी नगराध्यक्ष सुधीर कोठारी, मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले, प्रा. किरण उरकांदे, माजी आमदार राजू तिमांडे, शिवसेनेचे उपनेते अशोक शिंदे, अनिल जवादे,माजी नगराध्यक्ष पंढरी कापसे, संजय डेहणे, दादा देशकरी ,अशिष पर्वत,आकाश पाहाणे, लताबाई घवघवे,प्रदीप जोशी, नवीन भगत, प्रहार संघटनेचे गजानन कुबडे, अंकुश ठाकूर, श्रीकांत भगत, निलेश ठोंबरे, शंकर मुंजेवार, अशोक रामटेके, मोहम्मद रफीक, अनिल भोंगाडे, शांता देशमुख, डॉ. आदर्श गुजर, माजी सैनिक पुंडलिक बकाने, मुख्याध्यापक ब.रा चव्हाण, तुषार देवढे, उपजिल्हाप्रमुख अश्विनी तावडे, सुरेश चौधरी, प्रवीण उपासे, नगरसेवक धनंजय बकाने, रुपेश राजूरकर, प्रमोद गोहणे यांच्या सह हजारो नागरिक सहभागी झाले होते.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com