आंदोलनासमोर प्रशासन नमले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

टेकाडी - गोंडेगाव जिल्हा परिषद शाळा स्थलांतरणासाठी नऊ दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन अखेर संपले. शाळा स्थलांतरणाला जिल्हाधिकारी यांनी तात्पुरती स्थगिती दिली. बुधवारी सकाळी शालेय परिसरात विद्यार्थ्यांचा किलबिलाट झाला. विद्यार्थ्यांनी कुलूपबंद शाळा उघडताच शिक्षकांचे पुष्प देऊन स्वागत केले.

गोंडेगावचे पुनर्वसन झाल्याचे व जुन्या शाळेत विद्यार्थ्यांना धोका असल्याचे पत्र जिल्हा परिषद शिक्षण विभागाला वेकोलिकडून देण्यात आले होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व उपविभागीय अधिकारी, रामटेक यांनी पारशिवनी तहसील कार्यालय व पंचायत समितीला धारेवर धरत विद्यार्थ्यांना इजा झाल्यास गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांची जबाबदारी असल्याचे तुघलकी फर्मान काढून शाळा १० डिसेंबरला स्थलांतरित करण्याचा आदेश दिला होता. शिक्षकांनी नवीन इमारतीत बस्तान हलविल्यानंतर विद्यार्थ्यांनी जुन्याच शाळेत राहण्याचा निर्णय घेतल्याने तब्बल नऊ दिवस शिक्षण विभाग व विद्यार्थी आमनेसामने होते.

गत सोमवारी बच्चू कडू यांच्या नेतृत्वात नीतेश राऊत, रमेश कारामोरे, सुभाष डोकरीमारे यांनी विभागीय आयुक्त कार्यालय बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांना सदर प्रकरण सांगून शाळा सुरू करण्याची मागणी केली होती. 

प्रकल्पग्रस्तांचे काय? 
महाजेनको व भारत सरकारला कोळशाची गरज असल्याने वेकोलिकडून कोळसा काढणे गरजेचे असल्याचे शाळा स्थलांतरणाच्या पत्रात मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्पष्ट नमूद केले होते. शाळेला लागून असलेल्या प्रकल्पग्रस्तांचे काय, याचा विचार करण्याची गरज प्रशासनाला भासली नसल्याने वेकोलि व प्रशासन यांच्यात संगणमताचे धग अद्यापही कायम आहेत.

Web Title: Before the agitation the administration woke up