गोसेखुर्द प्रकल्पातील दूषित पाण्याच्या समस्येसाठी अर्धदफन आंदोलन

gosekhurda
gosekhurda

पवनी : भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेले गोसेखुर्द प्रकल्पात साचलेल्या दूषित पाण्याची समस्या आजही कायम आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जल स्त्रोत दूषित होत आहे. त्यासाठी युवाशक्ति संघटन काल (ता. 19) वैनगंगा नदीत अर्धदफन आंदोलन करून शाश्नाचे लक्ष वेधनार आहे.

पवनी तालुक्यात गोसेखुर्द येथे वैनगंगा नदीवर मोठे धरण बांधले गेले. 2009 पासून त्यामध्ये पाणी साठविणे सुरु झाले. असल्याने पाणी सिंचित राहू लागले आहे. नागपुरातून वाहत येणाऱ्या नागनदीचे घाण पाणी कन्हान नदी द्वारे वैनगंगा नदीत मिसळते व हे पाणी गोसे धरणात जाते. नागनदी ही नागपुरातून उगम पावली असून घराघरातील सांडपाणी नागनदीचे पात्रात सोडले जाते. त्याचप्रमाणे नागपुरातील विविध केमीकल कंपन्यांचे वेस्टेज रासायनिक पाणी नागनदीतून वाहत जाऊन वैनगंगेच्या पाण्यात जमा होत आहे. त्यामुळे गोसेधरणातील संपूर्ण जलसाठा दूषित झाला आहे.धरणातील पाणी आरोग्यासाठी हानिकारक  बनले असून प्रशासन व लोक प्रतिनिधी उदासीन आहे.

नागपुरातून दररोज ५०० ‘दलघमी’ सांडपाणी तयार होते आणि त्यातील २७० ‘दलघमी’ सांडपाणी नागपुरातील नागनदी मधून वाहते. धरणात पाणी अडविल्यामुळे गोसेखुर्द पासून सुमारे ३०-३५ किलोमीटर भंडारा-कारधापर्यंत वैनगंगा नदी दुथडी पाण्याने भरली राहत आहे. नागनदीचे पाणी मिसळल्यामुळे पाणी दूषित झाले असून पाण्यातून दुर्गंधी येत आहे. पाण्याचा रंग हिरवट काळसर झाला आहे.

पवनी व भंडारा येथे नगरपरिषद द्वारा लोकांना पिण्याचे पाण्याचा पुरवठा वैनगंगा नदीतूनच केला जातो. जलशुद्धिकरन  करून पाणी दिल्या जाते तरी पाणी पिताना पाण्याचा वेगळाच वास येतो. एकंदरीत या दूषित पाण्यामुळे लोकांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे. कोणत्याही प्रकारचा आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नदीकाठावर बरेच गावे आहेत. तेथील महिला पुरुष नदीच्या पाण्यात आंघोळ करतात. त्या दूषित पाण्यामुळे काही लोकांच्या अंगाला खाज सुटणे, अंगावर लालसर चट्टे येणे, डायरिया, पोटाचे विकार वकावीळ रोगाचा प्रादूर्भाव जास्त प्रमाणात दिसत आहे. नदी काठावरील गावात ग्रामपंचायत मार्फत याच नदीतील पाणी गावातील लोकांना पिण्यासाठी पुरविले जाते. फिल्टरची खास सोय नसल्याने ग्रामीण भागातील लोकांना या दूषित पाण्यापासून धोका निर्माण झाला आहे.

वैनगंगेच्या पाण्यात नाग नदीचे दूषित घाण पाणी जाऊ न देण्याची खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे. कारण नागरिकांच्या आरोग्यास दिवसेंदिवस आजाराचा धोका निर्माण होत आाहे. संपूर्ण नदी पात्रातील साचलेले पाणी दूषित झाल्यामुळे मासोळ्यांचे उत्पादन घटले आहे. ढिवर समाज बांधवांच्या रोजगारावर गंभीर परिणाम झाला आहे. धरणात येणारे नागनदीचे दुषित पाणी स्वच्छ करण्याविषयी पालकमंत्री पासुन अधिकाऱ्यांकडून पाणी शुद्धिसाठी उपाययोजना करण्याचे प्रवचन देण्यात येत आहे मात्र सांडपाण्याच्या स्वच्छतेसाठी सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) उभारले जात नाही, तोपर्यंत नागनदी खऱ्या अर्थाने स्वच्छ होणार नाही व दूषित पाण्यामुळे होणारे आजार पळणार नाही.

पाणी नदीत राहील आणि पुराचा धोका टळेल हे एकवेळ मान्य केले, तरीही सांडपाण्यामुळे पूर्ण नदीच्या दूषित होणाऱ्या पाण्याचा प्रश्न कायम आहे.पाणी बचत व नदीतील घाण शुध्द करण्यासाठी प्रबळ उपाययोजनेची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com