मार्लेगाव परिसरातील नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात

agitation
agitation

उमरखेड (जि. यवतमाळ) : गेल्या सहा दिवसांपासून पैनगंगा नदी खालच्या भागातील गावातील शेकडो नागरिकांचे बोरी (चातारी) च्या नदीपात्रात धरणे आंदोलन सुरू असून आता नदीवरच्या भागातील जवळपास 20 गावांतील मार्लेगाव येथील नदीपात्रात आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत. याबाबत  पळशी येथे नुकतीच बैठक पार पडली.

पैनगंगा नदीला तिसरा कालवा घोषित करण्यात यावा, या मुख्य मागणीसह अन्य पाच मागण्यांच्या पूर्ततेसाठी विदर्भ व मराठवाड्यातील नदीकाठावरील गावागावांत नदीपात्रातील आंदोलनाची दखल प्रत्येक नागरिक घेत आहे  ही पाण्याची समस्या दरवर्षीची आहे. नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे आता आरपारची भाषा नागरिक बोलू लागले आहेत. हे आंदोलन चिघळताना दिसत आहे. दोन दिवसाअगोदर पळशी येथे झालेल्या बैठकीवरून दिसून येत आहे. नदीखालच्या गावातील धरणे आंदोलन हे सात दिवसांपासून सुरू असून सोमवारपासून हे आंदोलन आमरण उपोषणात बदलणार आहे. बोरीपात्रात आंदोलन सुरू राहणार असून लवकरच नदीच्यावरच्या भागातील तिवडी, टाकळी, लिंबगव्हाण, मार्लेगाव, संगम चिंचोली, बिटरगाव, बेलखेड, बारा व पळशी यासह मराठवाड्यातील गावांतील नागरिक मार्लेगावच्या नदीपुलाजवळील पात्रात आंदोलन सुरू करणार असल्याची माहिती विखे पाटील कृषी परिषदेचे तालुकाध्यक्ष गजानन कदम यांनी ’सकाळ’शी बोलताना दिली. हे आंदोलन जोपर्यंत शासन नदीला तिसरा कालवा जाहीर करून पाणी सोडत नाही, तोपर्यंत सुरू ठेवण्याचा ठाम निर्धार गावकर्‍यांनी केल्याचे त्यांनी सांगितले.

प्रहारच्या कार्यकर्त्यांनी घेतल्या नदीपात्रात उड्या
दरम्यान रविवारी (ता. 25) सकाळी साडेसात दरम्यान प्रहार जनशक्तीच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी इसापूर धरणाच्या नदीपात्रात उड्या घेऊन शासनाला अल्टिमेटम दिला. दोन दिवसांत नदीपात्रात पाणी न सोडल्यास आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचे प्रहारचे संपर्कप्रमुख प्रमोद कुदळे यांनी सकाळला सांगितले. उड्या मारण्याच्या आंदोलनात 50 पेक्षा जास्त कार्यकर्ते सहभागी असल्याची माहिती त्यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com