विदर्भवाद्यांनी केली नागपूर कराराची होळी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 सप्टेंबर 2016

नागपूर - गेल्या 58 वर्षांपासून नागपूर करारातील एकाही अटीचे पालन करण्यात आले नाही. या करारामुळे विदर्भातील जनतेवर आजवर अन्यायच झाला. हा करार नव्हे तर विदर्भवाद्यांचा घात आहे. त्याचा निषेध म्हणून विदर्भ राज्य आघाडीच्या वतीने बुधवारी संविधान चौकात नागपूर कराराची होळी करण्यात आली. 

विदर्भातील लोकांना विकासाचे जे स्वप्न दाखवून नागपूर करार करण्यात आला. परंतु, विदर्भातील जनतेसाठी ते केवळ स्वप्न ठरलेच. विदर्भातील तरुणांना लोकसंख्येच्या प्रमाणात 23 टक्के नोकऱ्या देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्याचेसुद्धा पालन केले नाही. रस्ते, सिंचनाचा निधी पश्‍चिम महाराष्ट्राकडेच वळविल्याने विदर्भातील अनुशेष वाढला. 58 वर्षांपूर्वी ज्या आधारावर नागपूर करार करण्यात आला होता. त्यातील एकाही अटींचे पालन करण्यात आले नाही. त्यामुळे हा करार म्हणजे विदर्भातील जनतेवर अन्याय असून त्याचाच निषेध नागपूर कराराची होळी करून विदर्भवाद्यांनी केली. या वेळी विदर्भवाद्यांनी वेगळा विदर्भ झाला पाहिजे, विदर्भ राज्य लेकर रहेंगे, विदर्भ विरोधकांना धडा शिकवू, केंद्र व राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. याप्रसंगी विदर्भ राज्य आघाडीचे कार्याध्यक्ष ऍड. रवी सन्याल, विदर्भ कनेक्‍टचे ऍड. मुकेश समर्थ, ज्येष्ठ पत्रकार उमेश चौबे, श्‍याम पांढरीपांडे, अविनाश पाठक, ऍड. नीरज खांदेवाले यांनी नागपूर करार काय होता, यावर प्रकाश टाकला. या वेळी अहमदभाई कादर, इंटकचे त्रिशरण शहारे, विलास भालेकर, सचिन रेणू, शैलेंद्र हारोडे, राजेश काकडे, दिलीप नरवडीया, अशफाक रहमान उपस्थित होते. 

Web Title: agreement Holi in Nagpur