esakal | यशोमती ठाकूर यांच्याबद्दल बदनामीकारक पोस्ट करणे भोवले; कृषी पर्यवेक्षक निलंबित
sakal

बोलून बातमी शोधा

 Agricultural Supervisor suspended did post against Yashomati thakur

मिळालेल्या माहितीनुसार आवाज प्रहार नामक एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर मंगळवारी धारणी कृषी कार्यालयात कार्यरत असणारे कृषी पर्यवेक्षक अरुण बेठेकर यांनी एक पोस्ट केली.

यशोमती ठाकूर यांच्याबद्दल बदनामीकारक पोस्ट करणे भोवले; कृषी पर्यवेक्षक निलंबित

sakal_logo
By
प्रतीक मालवीय

धारणी (जि. अमरावती) : सोशल मीडियाच्या एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पालकमंत्र्यांच्या विरोधात धारणी येथील एका कृषी अधिका-याने विवादास्पद पोस्ट टाकल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा युवक काँग्रेसचे पदाधिकारी या घटनेवरून आक्रमक झाले असून त्यांनी धारणी व अमरावतीच्या राजापेठ पोलिस ठाण्यात संबंधित कृषी अधिका-यांच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार आवाज प्रहार नामक एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर मंगळवारी धारणी कृषी कार्यालयात कार्यरत असणारे कृषी पर्यवेक्षक अरुण बेठेकर यांनी एक पोस्ट केली. त्यात मेळघाटातील आदिवासी बांधवांवर पालकमंत्र्यांकडून अन्याय केला जात असल्याचे म्हटले होते. 

अधिक वाचा - ...अन् शोकाकुळ नातेवाईक मृतदेह विसाव्यावर सोडून सैरावैरा पळू लागले

या व्हॉट्सअ‍ॅप मॅसेजला मेळघाटसोबत जिल्ह्याच्या अनेक काँग्रेस कार्यकर्ते यांनी विरोध केला, तसेच याबाबत सर्वांनी नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या विरोधात आपत्तीजनक संदेश व्हायरल करणा-या शासकीय अधिका-याविरोधात कार्यवाही झाली पाहिजे, अशी मागणी कार्यकर्त्यांची होती. 

 अमरावती जिल्ह्याच्या युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पंकज मोरे यांनी आपल्या कार्यकत्र्यांसोबत धारणी पोलिस ठाणे तथा अमरावतीच्या राजापेठ पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. यासंदर्भात कारवाई होऊन सदर कृषी पर्यवेक्षकाला निलंबित करण्यात आली आहे. 

हेही वाचा - शेतकऱ्याला अखेर मिळाले पिकविम्याचे पैसे; रक्कम वाचून बसेल धक्का

मी तो मॅसेज फॉरर्वड केलेला नाही. कुटुंबातील लहान मुलांकडून मॅसेज पाठविल्या गेल्या असावा, मी पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांचा आदर करतो. मी एक शासकीय कर्मचारी असल्याने असा मॅसेज कसा पाठवेल? झालेल्या चुकीबद्दल मी जाहीर माफी मागण्यास तयार आहे. 
-अरुण बेठेकर 
कृषी पर्यवेक्षक, धारणी.

संपादन - अथर्व महांकाळ