April Nuksan Bharpai : एप्रिलमधील नुकसान भरपाईचा मार्ग मोकळा; १६ कोटी ५५ लाख मंजूर | Latest Marathi News | Breaking Marathi News | Marathi Tajya Batmya | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

April Nuksan Bharpai

April Nuksan Bharpai: एप्रिलमधील नुकसान भरपाईचा मार्ग मोकळा; १६ कोटी ५५ लाख मंजूर

Akola: अवकाळी पावसामुळे यावर्षी जिल्ह्यात एप्रिलमध्ये पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. या नुकसानाची भरपाई देण्याचा मार्ग मोकळा झाला असून, राज्य सरकारने जिल्ह्यासाठी १६ कोटी ५५ लाखांच्या मदतीला मंजूर दिली आहे. जिल्ह्यात नऊ हजार २६८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांची हानी झाली होती. खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत असल्याने शेतकऱ्याना दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यात खरीपापाठोपाठ रब्बीतही अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मोठा फटका बसला होता. भर ऊन्हाळ्यात एप्रिलमध्ये झालेल्या वादळी वाळ्यासह अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले होते. (Latest Marathi News)

लिंबू, आंबा, संत्री, गहू, भाजीपाला, कांदा पिकांना सर्वाधिक फटका बसला होता. या नुकसानीचे पंचमाने कृषी, महसूल व जिल्हा परिषदच्या यंत्रणेकडून संयुक्तपणे करण्यात आले हाेते. त्यानुसार जिल्ह्यासाठी १६ कोटी ५५ लाख सात ८०० रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

खरीपापूर्वी १५ हजार शेतकऱ्यांना दिलासा

एप्रिलमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे अकोला जिल्ह्यातील ७०७ गावे बाधित झाली होती. त्यातील नुकसानग्रस्त शेतकरी संख्या १५ हजार ३७१ होती. या शेतकऱ्यांचे एकूण बाधित क्षेत्र नऊ हजार २६८ एवढे होते. (Marathi Tajya Batmya)

त्याची भरपाई करण्यासाठी राज्य सरकारने १६ कोटी ५५ लाख सात हजार ८०० रुपये निधी मंजूर केल्याने खरीपापूर्वी १५ हजारांवर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. निधी वितरणाची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे.

शासनाकडूनच थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम

पीक नुकसाची मदत यापूर्वी शासनाकडून जिल्हा प्रशासन व जिल्ह्यातून तालुक्यांना रक्कम वितरीत केली जात होती. त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा हाेत हाेती. त्याला लागणार विलंब बघता आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर शासन ऑनलाईन रक्कम जमा करणार आहे.

मदतीसाठी पात्र शेतकऱ्यांची माहिती संकलित करून ती राज्य सरकारच्या संबंधित विभागाकडे सादर केली जाईल. त्यानुसार मदतची रक्कम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात जमा हाेणार आहे. मदत वितरणाबाबत प्रभारी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी तहसीदलरांना लेखी सूचना दिल्या आहेत.

टॅग्स :Farmeragricultural news