ऍग्रोव्हिजनमुळे कृषीमध्ये परिवर्तन

ऍग्रोव्हिजनमुळे कृषीमध्ये परिवर्तन
नागपूर : विदर्भातील कृषी परिवर्तनासाठी महत्त्वाचे ठरत असलेल्या ऍग्रोव्हिजनचे हे अकरावे वर्ष आहे. प्रदर्शन 22 ते 25 नोव्हेंबरदरम्यान आयोजित केले असून यामध्ये कृषी तंत्रज्ञान कार्यशाळा, तंत्रज्ञान सादरीकरणाचे दालने, कृषिविषयक चर्चासत्रे, शेतीला दिशा देणाऱ्या परिषद, पशू प्रदर्शन, उद्योगासाठी दालने राहतील, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रेशीमबाग येथे होणाऱ्या या प्रदर्शनाचे उद्‌घाटन 22 नोव्हेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल. केंद्रीय कृषिमंत्री तोमर यावेळी उपस्थित राहणार आहेत. 23 नोव्हेंबरला विविध कृषी कार्यशाळांचे उद्‌घाटन केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. तसेच, 24 नोव्हेंबरला कृषी व अन्न तत्रज्ञान या विषयावरील परिषदेचे उद्‌घाटन केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योगमंत्री हरसिमरत सिंग कौर बादल करणार आहेत, असे गडकरी यांनी सांगितले.
ग्रामीण, कृषी व वन क्षेत्राला प्रोत्साहन व रोजगार मिळाला म्हणून विदर्भामध्ये ऍग्रोव्हिजन प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे. जैवइंधन, दुग्ध व्यवसाय, मधमाशीपालन यासारखे कृषीपूरक व आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारे कृषी उद्योग स्थापन करून ग्रामीण व आदिवासी लोकांचे जीवनमान उचावणे हा ऍग्रोव्हिजनचा मुख्य उद्देश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com