नागपुरात आजपासून ग्रामविकासावर मंथन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 डिसेंबर 2016

नागपूर - सकाळ माध्यम समूहाच्या ॲग्रोवन सरपंच महापरिषदेला रविवारपासून (ता. २५) उपराजधानीत दिमाखदार प्रारंभ होत आहे.

कृषिकेंद्रित ग्रामविकासाच्या मंथनात सहभागी होण्यासाठी राज्याच्या विविध भागांतील सरपंच शनिवारी सकाळपासूनच नागपूरमध्ये दाखल होऊ लागले आहेत. निवडक अशा एक हजार सरपंचांचा समावेश असलेल्या या महापरिषदेच्या व्यासपीठावरून केंद्र सरकारपासून ते ग्रामपंचायतीपर्यंतचे प्रतिनिधी ग्रामविकासावर आपली मते मांडणार आहेत. 

सहाव्या सरपंच महापरिषदेला आमदार निवासस्थानासमोरील डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती सभागृहात उद्या दुपारी १२ वाजता प्रारंभ होईल.

महाराष्ट्राच्या कृषिविकास व ग्रामसमृद्धीला चालना देणाऱ्या या महापरिषदेचे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते, महामार्ग व जलवाहतूकमंत्री नितीन गडकरी, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. 

दोन दिवस चालणाऱ्या ॲग्रोवन सरपंच महापरिषदेचे फोर्स मोटर्स हे मुख्य प्रायोजक आहेत. दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स, सिंटेक्‍स इंडस्ट्रीज, ॲग्रोस्टार, महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरण (मेडा) हे प्रायोजक आहेत. राज्याचा कृषी विभाग, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, जलसंधारण विभाग तसेच रोजगार हमी योजना विभागाचा सहयोग सरपंच महापरिषदेस लाभला आहे.

महापरिषदेच्या या कृषिकेंद्रित ग्रामविकासाच्या या जागरामध्ये आमदार आशिष देशमुख, सह्याद्री ॲग्रोचे विलास शिंदे, महाऑरेंजचे श्रीधर ठाकरे, गटशेतीचे अंकुश पडवळे, जलसंधारण विभागाचे मुख्य अभियंता शिवकुमार गिरी, सरपंच अतुल तिमांडे, चंदू पाटील, संतोष टिकेकर, योगिता गायकवाड, कांताबाई धगडी आदींसह इतर मान्यवर सहभागी होत आहेत.

महापरिषदेत आज उद्‌घाटन समारंभ 
मार्गदर्शन : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे 
परिसंवाद : ग्रामविकास आणि सरपंच 
वक्ते : पोपटराव पवार, आशिष देशमुख
परिसंवाद : कृषिविकासातून ग्रामविकास 
वक्ते : कृषी आयुक्त विकास देशमुख, सह्याद्री ॲग्रोचे अध्यक्ष विलास शिंदे, महाऑरेंजचे कार्यकारी अध्यक्ष श्रीधर ठाकरे

Web Title: agrowon sarpanch mahaparishad in nagpur