आयटकचा 31 ऑक्‍टोबरला मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

नागपूर: ब्रिटिशांच्या गुलामगिरीविरुद्धच्या स्वातंत्र्य लढ्यात श्रमिकांना संघटित करून 31 ऑक्‍टोबर 1920 राजी ऑल इंडिया ट्रेड युनियन कॉंग्रेस (आयटक) ची स्थापना करण्यात आली. शतकीय वर्षाच्या पहिल्याच दिवशी 31 ऑक्‍टोबरला आयटकतर्फे मुंबईत शासनाच्या जनविरोधी धोरणांचा विरोध करण्यासाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात 1 लाख श्रमिकांना सहभागी करून घेण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

मोर्चाच्या तयारीच्यानिमित्ताने शुक्रवारी (ता. 16) वसंतराव देशपांडे सभागृहात विविध क्षेत्रांतील संघटनांचा विभागीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. यात नागपूरसह भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा जिल्ह्याचे पदाधिकारी सहभागी झाल होते. ज्येष्ठ आयटक नेते मोहनदास नायडू यांच्या अध्यक्षतेत आयोजित मेळाव्याला आयटकचे राष्ट्रीय सचिव मोहन शर्मा, शाम काळे, मोलकरीण संघटनेचे सरचिटणीस बबली रावत, दिलीप उटाणे, महेश कोपुलवार, देवराव चावडे, माधवराव बांते आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे बेरोजगारी, महागाई वाढत असून अर्थव्यवस्था ढासळत आहे. प्रदीर्घ संघर्षानंतर अस्तित्वात आलेले 44 श्रम कायदे रद्द करून 4 कामगार संहिता लागू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याद्वारे कायम कामगार संकल्पना संपवून कंत्राटी कामगार या संकल्पनेला चालना दिली जात आहे. यासह अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी, आशा वर्कर्स, शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचेही शोषण सुरू आहे. या विरोधात 31 ऑक्‍टोबरचा मोर्चा असणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aitak's march on 31st October