अजित बेकरीच्या संचालकांचे 41 लाख केले लंपास

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

नागपूर : शहरातील बेकरी उद्योजक म्हणून प्रसिद्ध असलेले अजित बेकरीच्या संचालकांची 41 लाख 50 हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आली. आरोपींनी त्यांच्या दोन बॅंक खात्यांमधून पैसे ऑनलाइन पद्धतीने परस्पर लंपास केले असून, या प्रकरणी धंतोली पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नागपूर : शहरातील बेकरी उद्योजक म्हणून प्रसिद्ध असलेले अजित बेकरीच्या संचालकांची 41 लाख 50 हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आली. आरोपींनी त्यांच्या दोन बॅंक खात्यांमधून पैसे ऑनलाइन पद्धतीने परस्पर लंपास केले असून, या प्रकरणी धंतोली पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित बेकरीच्या संचालक अवंती अभिराम देशमुख (48, रा. फार्म लॅंड, रामदासपेठ) यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. अजित बेकरीचे संस्थापक दिवाडकर यांची त्या मुलगी आहेत. त्यांचा विवाह झाला असून देशमुख नाव सासुरवाडीतील आहे. दरम्यान, त्या अजित बेकरीमध्ये भागीदार असून त्यांचा मोबाईल क्रमांक पतीच्या नावाने आहे. अजित बेकरी आणि मेसर्स ए. आर. फूड कंपनीच्या नावाने दोन खाते धंतोली परिसरातील सारस्वत बॅंकेत आहेत. या बॅंक खात्यांशी अवंती यांचा मोबाईल क्रमांक जोडला आहे. 28 सप्टेंबर संध्याकाळी साडेचार ते 30 सप्टेंबर सकाळी दहादरम्यान त्यांच्या दोन्ही बॅंक खात्यांमधून 41 लाख 50 हजार जाफर खान याच्या नावाने असलेल्या एचडीएफसी बॅंकेतील 50100301049482, आंध्रा बॅंकेत समीर सिंग नावाने असलेल्या 243810100031575, डीजी इंटरप्रायजेस डेव्हलपमेंट कंपनीचे 04521900004367, वंदना देवी नावाने आयसीआयसीआय बॅंकेतील 032601528882 क्रमांकाचे खाते आणि इंडिया फर्स्ट ट्रेडिंग कंपनीचे आयसीआयसीआय बॅंकेतील 4003055153 क्रमांकाच्या बॅंक खात्यांमध्ये वळते करण्यात आले. हा प्रकार लक्षात येताच अवंती यांनी पोलिसांत तक्रार दिली. सायबर सेलच्या मदतीने याचा तपास सुरू आहे. पण, अद्यापही ही फसवणूक कशाप्रकारे झाली, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ajit bekri director