अजित पवारांनी घेतली भाजप नेते फुंडकर यांच्या परिवाराची भेट

phundkar
phundkar

खामगाव : लोकनेते दिवंगत भाऊसाहेब फुंडकर यांच्या परिवाराची शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसनेते अजित पवार, धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सखामगाव येथे भेट घेऊन कौटुंबिक जिव्हाळ्याचा परिचय आणून दिला. यावेळी भाऊसाहेब फुंडकर यांचे पुत्र आमदार आकाश फुंडकर व सागर फुंडकर यांचे त्यांनी सांत्वन केले.

निर्धार यात्रेसाठी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीची नेतेमंडळी शनिवारी बुलडाणा जिल्ह्यात होती. यावेळी त्यांनी आवर्जून फुंडकर परिवाराची भेट घेतली. अजित पवार यांनी भाऊसाहेब फुंडकर यांच्यात पक्षविरहीत नाते जोपासत गेले होते. भाऊसाहेब फुंडकर याच्या आठवणींना आमदार आकाश फुंडकर, सागर फुंडकर यांच्यासोबत चर्चा करत उजाळा दिला.

अजित पवार यांनी दिवंगत फुंडकर यांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन आपण कायम फुंडकर परिवारासोबत असल्याचे अभिवचनच यावेळी दिले. धनंजय मुंडे यांनी आमदार आकाश फुंडकर यांना मिठी मारत पितृशोकातून सावरण्यासाठी धीर दिला. अजित पवारांनी सुद्धा सागर फुंडकर यांचा हात हातात घेत आस्थेने विचारपूस केली.त्यांच्या सोबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे होते. दिवंगत भाऊसाहेब फुंडकर यांचे विविध पक्षातील राजकीय नेत्यांशी असलेले पारिवारिक संबंध यानिमित्ताने पुन्हा एकदा दिसून आले.

भाऊसाहेब गेल्याने आमची मोठी हानी झाली. या धक्क्यातून आम्ही आजही सावरू शकलो नाही. भाऊसाहेब यांनी शेतकरी, सर्वसामान्य माणसाच्या विकासाचा वसा घेतला होता. त्याचे कार्य आम्ही पुढे नेत आहोत. भाऊसाहेब यांचे सर्वच पक्षातील नेत्यांशी पारिवारिक नाते होते. पवार कुटुंब सुद्धा त्यापैकीच एक आहे. भाऊसाहेच्या नात्यांची शिदोरी हीच आमची आयुष्यभराची ऊर्जा आहे.
- ऍड आकाश फुंडकर, आमदार, खामगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com