
Wardha Visit: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे वर्धा दौऱ्यावर आहेत. गुरुवारी सकाळी लवकर ते जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीसाठी दाखल झाले. अजित पवार हे त्यांच्या शिस्तप्रिय वागण्यासाठी आणि बिनधास्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत येतात. एखाद्या कामाच्या ठिकाणी काही खटकल्यास ते सर्वांसमोर अधिकाऱ्यांची कानउघाडणी करतात. पदाधिकाऱ्यांनाही तिथंच झापतात. आता वर्ध्यातही स्वागतासाठी आलेल्या कार्यकर्त्याला स्वच्छतेवरून थेट सुनावलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.