भाऊसाहेबांच्या पक्षसेवेचं फळ आमदार फुंडकर यांना मिळणार?

fundkar
fundkar

खमागाव (बुलडाणा) : कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या निधनानंतर त्यांचेच पुत्र पश्चिम विदर्भातील अभ्यासु आमदार अॅड. आकाश फुंडकर यांची मंत्री मंडळात वर्णी लागणार असल्याची चर्चा होत आहे. आयुष्यभर पक्षसेवा करणाऱ्या भाऊसाहेब फुंडकर यांच्या कष्टाचं फळ आता त्यांचे पुत्र आमदार ऍड आकाश फुंडकर यांना मिळणार काय? अशी अपेक्षा यानिमित्ताने विदर्भातील फुंडकर यांच्या चाहत्यांमधून व्यक्त होत आहे.

कृषिमंत्री भाऊसाहेब यांचे निधन झाल्यापासून त्यांचे पद रिक्त असून मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यांच्या विधान परिषदेच्या रिक्त जागेवर अरुण अडसळ यांची वर्णी लागली. दरम्यान आता फुंडकर परिवारातील आमदार आकाश फुंडकर यांचे नाव मंत्रीपदासाठी समोर येत आहे. खामगाव मतदार संघातील काँग्रेसचे 15 वर्षांचे  वर्चस्व मोडत काढीत आकाश फुंडकर हे मागील निवडणुकीत विजयी झाले. त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती काँग्रेस मुक्त करत सर्वच जागांवर भाजपाचा झेंडा फडकविला. थेट झालेल्या निवडणुकीत  भाजपाचा नगराध्यक्ष व नगरपालिकेत भाजपाची सत्ता आणली.

दरम्यान काही महिन्यांपूर्वी कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांचे निधन झाल्याने मतदार संघ व त्यांच्या राज्यभरातील त्यांच्या चाहत्यांमध्ये एक प्रकारची पोकळी निर्माण झाली. भाऊसाहेब फुंडकर हे सध्याच्या मंत्रिमंडळातील सर्वात जेष्ठ नेते होते. त्यांनी कृषीखात्याची जबाबदारी लीलया सांभाळली. त्यांच्या निधनानंतर अनेकदा मंत्री मंडळ विस्तराची चर्चा झाली मात्र मुहूर्त उजाळला नाही. आता पुन्हा मंत्री मंडळ विस्तार होईल अशी चर्चा असून या विस्तारात भाऊसाहेब फुंडकर यांचे पुत्र ऍड आकाश फुंडकर यांचे नाव समोर आल्याने त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. आमदार ऍड आकाश फुंडकर यांची मंत्री मंडळात वर्णी लागल्यास ते विदर्भातील सर्वात  तरुण मंत्री असतील.

आमदार ऍड. आकाश फुंडकर यांनी मतदार संघात खूप कामे केली आहेत. जलयुक्त शिवार, शेततळे व त्यावर वीज जोडणीचा राज्यातील पहिला प्रयोग  त्यांच्या पुढाकाराने झाला आणि खारपानपट्ट्यात नंदनवन फुलले. त्यांचे गेल्या चार वर्षातील विकास कामाचे रिपोर्ट कार्ड राज्यात नंबर वन ठरेल असेच आहे. भाऊसाहेबांच्या कार्याची पावती देत पक्ष त्यांचे पुत्र आमदार ऍड. आकाश फुंडकर यांना मंत्रिपद देत असेल वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी त्यांना मिळणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com