‘अभाविप’च्या राड्याची राज्यपालांकडे तक्रार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 फेब्रुवारी 2019

कारवाई निश्‍चित होणार - कुलगुरू 
अभाविपकडून विद्यापीठाची तोडफोड केल्यानंतर प्रशासनाकडून मौन पाळण्यात आले होते. तोडफोड सुरू असताना कुलगुरू कक्षात होते. बैठक असल्याने ते विद्यापीठ कॅम्पसमधील कार्यालयाकडे निघून गेले. यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलण्याचे टाळले. तोडफोड करणाऱ्यांवर निश्‍चित कारवाई होणार असल्याचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी शनिवारी सांगितले. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्यावर व्यवस्थापन परिषद सदस्य व सिनेट सदस्यांसोबत मिळून कुलसचिवांना निवेदन सादर केले. यामुळे तोडफोडीच्या वेळी ते उपस्थित होते काय, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. यावर तेही तपासणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नागपूर - अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विद्यापीठात केलेल्या तोडफोडप्रकरणी मानवी हक्क संरक्षण जागृतीने राज्यपालांना ई-मेलद्वारे तक्रार केली. तक्रारीत अभाविपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देणे व वेळेत कारवाई न करणाऱ्या कुलगुरूंचा राजीनामा घेण्याची मागणी केली.

निकाल वेळत लागत नसल्याच्या कारणावरून विद्यापीठात शुक्रवारी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली व सुरक्षारक्षकांना धक्काबुक्की केली. चोवीस तासापेक्षा अधिक काळ लोटूनही विद्यापीठ प्रशासनाकडून कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. विद्यापीठातील मालमत्ता शासकीय असून, त्याचे नुकसान केल्यास सीआरपीसी/आयपीसी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करणे अनिवार्य आहे.

विशेष म्हणजे पोलिसही यावेळी घटनास्थळी उपस्थित होती. त्यांनीही तक्रार नसल्याची माहिती देत घटनेकडे कानाडोळा केला. शिवाय प्रशासनाने कारवाई न केल्याने या कृत्याला प्रोत्साहन दिल्यासारखे होत असल्याने त्याची जबाबदारी कुलगुरूंनी स्वीकारून राजीनामा द्यावा. अशी मागणी संघटनेने केली. तक्रारीची प्रत उच्च शिक्षण सहसंचालकांकडे दिल्याचे उपाध्यक्ष डॉ. अभिषेक हरिदार यांनी सांगितले. त्यामुळे यावर येत्या काळात मोठ्या प्रमाणात वाद उफाळणार असून, मार्च महिन्यात होणाऱ्या सिनेट बैठकीतही पडसाद उमटणार असल्याचे चित्र आहे. 

कारवाई निश्‍चित होणार - कुलगुरू 
अभाविपकडून विद्यापीठाची तोडफोड केल्यानंतर प्रशासनाकडून मौन पाळण्यात आले होते. तोडफोड सुरू असताना कुलगुरू कक्षात होते. बैठक असल्याने ते विद्यापीठ कॅम्पसमधील कार्यालयाकडे निघून गेले. यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलण्याचे टाळले. तोडफोड करणाऱ्यांवर निश्‍चित कारवाई होणार असल्याचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी शनिवारी सांगितले. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्यावर व्यवस्थापन परिषद सदस्य व सिनेट सदस्यांसोबत मिळून कुलसचिवांना निवेदन सादर केले. यामुळे तोडफोडीच्या वेळी ते उपस्थित होते काय, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. यावर तेही तपासणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Akhil Bharatiya Vidyarthi Parishad complained to the Governor through e-mail