esakal | Big Breaking : अकोल्यात रविवारी कोरोनाचा भडका; एकाच दिवशी 32 अहवाल पॉझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

corona test in akola.jpg

विशेष म्हणजे आज प्राप्त झालेल्या बत्तीस अहवालांमध्ये एका माजी नगरसेवकासह एका पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

Big Breaking : अकोल्यात रविवारी कोरोनाचा भडका; एकाच दिवशी 32 अहवाल पॉझिटिव्ह

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : मागील दोन दिवसापासून पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याची गती काहीशी मंदावली होती. मात्र अशातच रविवारी सकाळी प्राप्त झालेल्या एकूण 169 अहवाल पैकी तब्बल बत्तीस अहवाल हे पॉझिटिव्ह आले असून एकाच दिवशी कोरोनाने मागील दोन दिवसाची तूट भरून काढली आहे. 

विशेष म्हणजे आज प्राप्त झालेल्या बत्तीस अहवालांमध्ये एका माजी नगरसेवकासह एका पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालय यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी 169 अहवाल प्राप्त झाले त्यामध्ये 32 अहवाल पॉझिटिव्ह आले असून उर्वरित अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आवश्यक वाचा - अबब! सोन्यापेक्षाही महाग असलेल्या कस्तुरीच्या मातीची हवेली, तीही महाराष्ट्रातील या जिल्ह्यात, सुगंधासाठी पर्यटकही...

मुर्तीजापुर येथील रुग्णाचा मृत्यू
एक रुग्ण मयत असून तो 13 मे रोजी मयत झाला असून त्याचा अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आला आहे.हा रुग्ण 48 वर्षीय पुरुष असून मूर्तिजापूर येथील रहिवासी आहे.

हेही वाचा - Lockdown : 'तुम्ही कंटेन्मेंट झोनमध्ये आहात विसरलाय वाटतेय...'

रविवारी या भागात आढळले रुग्ण
रविवारी सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णात 10 महिला व 22 पुरुष आहेत. एक महिला जिल्हा स्त्री रुग्णालयातून संदर्भित आहे. तारफ़ैल-चार,माळीपूरा-चार, खैर मोहम्मद प्लॉट-चार
आंबेडकर नगर-तीन, ताजनापेठ-तीन, अकोटफ़ैल-तीन तर
मुर्तिजापूर, आगरवेस, बिरलागेट जठारपेठ,खरप, काळा मारोती, ओल्ड आळशी प्लॉट, वर्धमान डुप्लेक्स राजपुतपुरा, रामदासपेठ पोलीस क्वांर्टर, नायगाव, खोलेश्वर, शास्त्रीनगर येथील प्रत्येकी एक आहेत. सोबतच आज 17 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-252
मयत-18 (17+1), डिस्चार्ज-117
दाखल रुग्ण(ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह)-117

loading image