Akola Crime News
esakal
अकोला, ता. १ : अकोल्यातील बहुचर्चित अक्षय नागलकर खून प्रकरणाचा उलगडा करत पोलिसांनी एकूण नऊ आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून मृतकाचे हाडांचे तुकडे, दोन देशी पिस्तुल, सहा जिवंत काडतुसे, चारचाकी वाहन आणि तीन दुचाकी तसेच सात मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
२२ ऑक्टोबर रोजी अक्षय विनायक नागलकर (वय २६) हा ‘थोड्याच वेळात येतो’ असे सांगून घरून बाहेर पडला, मात्र परतला नाही. दुसऱ्या दिवशी कुटुंबीयांनी डाबकी रोड पोलिस ठाण्यात मिसिंगची नोंद केली. तपासादरम्यान नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केल्याने पोलीस अधीक्षक अर्चीत चांडक यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील व स्थानिक गुन्हे शाखेच्या मार्गदर्शनाखाली आठ पथके तयार करून तपासाला गती दिली.