esakal | coronavirus:‘सीमा बंद’; संचार बंदी लागू!
sakal

बोलून बातमी शोधा

akola road

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी व सामूहिक संपर्काला ‘ब्रेक’ देण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना शासन व जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येत आहेत. त्याअंतर्गत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आता व्यक्तींच्या मुक्त संचारास बंदी घालत जिल्ह्यात संचार बंदी लागू केली आहे

coronavirus:‘सीमा बंद’; संचार बंदी लागू!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी व सामूहिक संपर्काला ‘ब्रेक’ देण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना शासन व जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येत आहेत. त्याअंतर्गत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आता व्यक्तींच्या मुक्त संचारास बंदी घालत जिल्ह्यात संचार बंदी लागू केली आहे.

त्यासोबतच जिल्ह्यातील सर्व सीमा तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत. सदर आदेश 31 मार्चचे मध्यरात्री 12 वाजेपर्यंत अंमलात राहिल. 
कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून शासनाच्या वतीने लोकांना घरी राहण्याचे सांगण्यात येत आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यातील अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. त्याअंतर्गत आता जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यासोबतच आता जिल्ह्यातील सर्व सिमा तात्काळ बंद करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील कोणत्याही नागरिकास अत्यावश्‍यक कारण वगळता बाहेर जिल्ह्यात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. जिल्ह्यातील नागरिक नसलेल्या कोणत्याही व्यक्तीस जिल्ह्यात अत्यावश्‍यक कारणाशिवाय प्रवेश करण्यास मनाई करण्यात येत आहे. पुणे, मुंबई व इतर महानगरातून जिल्ह्यात आलेल्या व्यक्तींना वैद्यकीय कारणांशिवाय घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येईल. 

आंदोलनं, मोर्चे, मिरवणुकीवर निर्बंध
जिल्ह्यातील खासगी व सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा पाच पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतील असे सर्व प्रकारचे कार्यक्रम, समारंभ, सांस्कृतीक कार्यक्रम, सन, उत्सव, उरुस, जत्रा, मनोरंजानाचे कार्यक्रम, क्रीडा व इतर सर्व स्पर्धा, कार्यशाळा, कॅम्प, प्रशिक्षण वर्ग, बैठक, मिरवणूक, मेळावे, सभा, आंदोलनं, मोर्चे, देशाअंतर्गत व परदेशी सहलींचे आयोजन करण्यास मनाई करण्यात आली आहे. 


आदेशातून यांना वगळले
  पोलिस व आरोग्य तसेच आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित व्यक्ती किंवा वाहने
  रुग्ण वाहतूक व हॉस्पीटलमधील डॉक्टर व पॅरामेडिकल स्टाफ
  अत्यावश्‍यक सेवा, वीज, पाणीपुरवठा, दुरसंचार, औषधी वाहने, अग्नीशमन, बॅंक व एटीएममध्ये पैसे भरणारी वाहणे व कर्तव्यावरील अधिकारी, कर्मचारी
  जीवनावश्‍यक वस्तुंची सेवा, वस्तू व माल यांची वाहतूक व कर्तव्याकरील अधिकारी, कर्मचारी
  प्रसार माध्यम व त्यांचे प्रतिनिधी
  जिल्हा दंडाधिकारी यांचे वतीने परवानगी दिलेली वाहने व अधिकारी, कर्मचारी, व्यक्ती

खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद
जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयातील व्यवहार आॅनलाईन पद्धतीने करण्यात येतात. सदर कामकाज हे संगणकीय पद्धतीने बायोमॅट्रीक मशीनद्वारे करण्यात येत असल्याम्ळे कोरोना विषाणूचा प्रसार व संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयातील मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार सोमवार (ता. 23) पासून 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. सदर आदेशाचे उल्लंघन करणारा व्यक्ती भारतीय दंड संहिता 1860 (45)च्या कलम 188 नुसार कारवाईस पात्र राहिल. 


उद्योग, कागखाने सुद्धा बंद
जिल्ह्यात अनेक औद्योगिक संस्था, कारखाने, उद्योग धंदे व तत्सम व्यवसाय सुरू आहेत. सदर संबंधित आस्थापनेवरील जिल्ह्यातील विविध ठिकाणावरुन तसेच जिल्ह्याबाहेरुन देखील कामगार, कर्मचारी वाहतून करणाऱ्या व्यक्ती येत असतात. त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातीर सर्व उद्योग, कारखाने व तत्सम आस्थापना सोमवार (ता. 23) पासून 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 

हे उद्योग, कारखाने वगळले

  •   औषधे निर्माण करणाऱ्या तसेच वैद्यकीय सेवेकरिता साहित्याची निर्मिती करणाऱ्या कंपन्या, कारखाने, उद्योग व्यवसाय
  •   सॅनिटायझर, साबण, जंतूनाशक हॅंडवॉश तयार करणाऱ्या कंपन्या, कारखाने, उद्योग व्यवसाय
  •   कृषी उत्पादनावर प्रक्रिया करणाऱ्या कंपन्या, दालमिल, ऑईल मिल, कारखाने, उद्योग व्यवसाय
  •   अत्यावश्‍यक वस्तू व सेवा पुरविणाऱ्या कंपन्या, कारखाने, उद्योग व्यवसाय
loading image