तीन दिवसांपासून बंद पडलेली बीएसएनएल सेवा सुरू

akola bsnl service start from midnight
akola bsnl service start from midnight

हिवरखेड (जि.अकोला) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे संपूर्ण नागरिकांची स्थिती बंदिस्तसारखी झाल्यामुळे आधीच नागरिकांचा जीव मेटाकुटीस आला आहे.

अशा परिस्थितीत नागरिकांना घरात सवडीचा वेळ असल्याने फोनवरून मित्र-मैत्रिणी नातेवाईक इष्टमित्रांसह संपर्क साधून सर्वांचे कुशलता विचारणे कोणी आजारी असल्यास त्याची विचारपूस करणे आणि आपण जवळ नसलो तरी एकमेकांच्या सुख,दुःखात सहभागी आहोत याची जाणीव करून देण्यासाठी भ्रमणध्वनीच्या माध्यमातून वार्तालाप करणे महत्त्वाचे असते.

एवढेच नाही तर आता फोरजी  इंटरनेट सेवेद्वारे घरातील सर्व सदस्यांना मनोरंजनासाठी स्मार्टफोन हाच महत्वाचा दुवा आहे. स्मार्टफोन द्वारेच मनोरंजन सोबतच विद्यार्थ्यांना अनेक शाळांमधील शिक्षकगण ऑनलाइन पद्धतीने इंटरनेट द्वारे शिक्षण देत आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवा म्हणून दूरसंचार सेवेचे महत्त्व वाढले आहे. 


मागील काही काळापासून खाजगी मोबाईल ऑपरेटर्स कंपन्यांनी आपले रिचार्ज दर कमालीचे वाढवल्यामुळे आणि त्या प्रमाणात सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलचे दर स्थिर आणि परवडणारे असल्याने हजारो लाखो ग्राहकांनी आपली मोबाईल कंपनी बदलुन बीएसएनएलची सेवा घेण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे हिवरखेड येथेही बीएसएनएल ग्राहकांच्या संख्येत मोठी वाढ झाली.

परंतु ह्या परिसरात बीएसएनएलची सेवा सुरू कमी आणि बंद जास्त राहत आहे. दोन मिनिटांसाठी जरी लाईन गेली तरी संपूर्ण दिवस मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद राहणे, कधी ओ एफ सी केबल तुटणे, कधी पावर प्लांट बंद पडणे, वरून डिझेल मिळत नसल्याची तक्रार, इत्यादी शेकडो कारणांमुळे वारंवार येथील बीएसएनएल सेवा कधी एक दिवसासाठी तर कधी अनेक दिवसांसाठी सारखी बंदच राहते.

कोरोनाच्या आपत्तीमध्ये लॉकडाऊनच्या काळातही बीएसएनएलच्या हिवरखेड येथील दोन आणि सौंदळा येथील एक अशा एकूण तीन टॉवर्सची मोबाईल आणि 4G इंटरनेट सेवा तीन दिवस सतत बंद राहिली. आणि बीएसएनएल चे हे तीन टॉवर पुन्हा कधी सुरळीत सुरू होतील याबाबत निश्चित माहिती द्यायला कोणीही तयार नव्हते. त्यामुळे ग्राहकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. टॉवर बंद असल्याबाबत संबंधितांना विचारणा केली असता मॉड्युल बिघडणे, पॉवर सप्लाय जळणे, ओ एफ सी केबल तुटणे, अशी वेगवेगळी कारणे सांगत असल्यामुळे संभ्रमाची स्थिती झाली आहे. ग्राहकांनी वरिष्ठांकडे अनेक तक्रारी केल्यानन्तर तब्बल तीन दिवसानंतर अखेर बीएसएनएल सेवा रात्री उशिरा सुरू झाली.

 वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन वारंवार बीएसएनएलची सेवा बंद पडण्याचे प्रकार थांबवावे अशी मागणी त्रस्त ग्राहक करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com