esakal | तहसील कार्यालय लॉकडाउन, शेतकऱ्यांची ससेहोलपट, फेरफार नकला देण्याची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

akola buldana news Tehsil office lockdown, farmers saseholpat, demand for change

येथील तहसील कार्यालयाचे मुख्य गेट बंद असून, कार्यालयीन कामकाज बंद असल्याचा सूचना फलक गेटवर लावण्यात आला आहे. शेतकऱ्यांना फेरफार नकला मिळत नसल्याने पीककर्जाची कामे रखडली आहेत. 

तहसील कार्यालय लॉकडाउन, शेतकऱ्यांची ससेहोलपट, फेरफार नकला देण्याची मागणी

sakal_logo
By
शाहीद कुरेशी

मोताळा (जि.बुलडाणा) : येथील तहसील कार्यालयाचे मुख्य गेट बंद असून, कार्यालयीन कामकाज बंद असल्याचा सूचना फलक गेटवर लावण्यात आला आहे. शेतकऱ्यांना फेरफार नकला मिळत नसल्याने पीककर्जाची कामे रखडली आहेत.  


शेतकऱ्यांना पिककर्जासाठी फेरफार नक्कल व इतर कागदपत्रांची आवश्‍यकता आहे. परंतु मोताळा तहसील कार्यालयाचे मेन गेट बंद असून, नागरिकांना तहसील कार्यालयात प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. कोविड आपत्ती व्यवस्थापनच्या अनुषंगाने सद्यस्थितीत कार्यालयीन कामकाज बंद आहे, कृपया सहकार्य करावे असा मजकूर लिहिलेला फलक तहसीलच्या मेन गेटवर लावण्यात आला आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

मलकापूर उपविभागातील मलकापूर व नांदुरा तहसील कार्यालयात शेतकऱ्यांना आवश्‍यक कागदपत्रे मिळत आहेत. परंतु याच उपविभागातील मोताळा तहसील कार्यालयातून सात जुलैपासून नागरिकांना कोणत्याही नकला दिल्या जात नाहीत. सोबतच कार्यालयीन कामकाज बंद असल्याचा फलक गेटवर लावण्यात आला आहे.

सीबीएसई बारावी परीक्षेत अकोल्यातील विद्यार्थी चमकले 

शेतकऱ्यांना फेरफार नक्कल जोडल्याशिवाय पीककर्जाचे काम पुढे सरकत नाही. परंतु मोताळा तहसीलदार यांनी तहसील कार्यालयाचे मुख्य गेट बंद केले असून, कोणालाही प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. वास्तविक शासकीय कार्यालय बंद करण्याबाबत शासनाचा कोणताच आदेश नाही. तरी, मोताळा तहसील कार्यालयाचे मेन गेट खुले करण्यात यावे.

Video: अरे हे काय? पेट्रोल दिलं नाही म्हणून चक्क ऑफिसमध्येच सोडले कोब्रा नाग 

अनावश्‍यक लोकांनी गर्दी करू नये याकरीता तहसील कार्यालयाचे मेन गेट बंद करण्यात आले आहे. परंतु कार्यालयीन कामकाज सुरळीतपणे सुरू आहे. शेतकऱ्यांना फेरफार नकला सुद्धा दिल्या जात आहेत.
- व्ही.एस. कुमरे, तहसीलदार, मोताळा.


विभागीय आयुक्तांनी घेतली दखल
सामाजिक कार्यकर्ते संतोष तांदूळकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून निवेदनाची प्रत अमरावती विभागीय आयुक्त यांना पाठवली. दरम्यान, विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी तातडीने दखल घेतली असून, यासंदर्भात जिल्हाधिकारी बुलडाणा यांना सूचना दिली आहे, असा संदेश संतोष तांदुळकर यांना पाठविला आहे.

(संपादन -  विवेक मेतकर)