अकोल्यात धावत्या कारने घेतला पेट ; जीवितहानी नाही

विवेक मेतकर
शुक्रवार, 18 मे 2018

अकोला : शहरातील राष्ट्रीय महामार्ग ६ वरील शिवणी विमानतळ येथे चालत्या कारने अचानक पेट घेतल्याची घटना आज शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली. या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, पेट घेतलेली कार जळून खाक झाली आहे

टाटा इंडिका (एमएच. २६ एल. १५२४) ही कार अकोल्याच्या दिशेने येत होती. शिवणी विमानतळाजवळ राष्ट्रीय महामार्ग ६ वर असलेल्या एका स्पीड ब्रेकरवर कार अचानक बंद पडली. कार चालकाने कार पुन्हा चालु करण्याचा प्रयत्न केला असता, कारच्या स्टेरिंग जवळून धूर यायला लागला आणि काही क्षणातच कारने पेट घेतला.

कारने पेट घेताच प्रसंगवधान राखत कारचालकाने तत्काळ कारमधून काढता पाय घेतला. मात्र तोपर्यंत संपूर्ण कारने पेट घेतला होता. सकाळची वेळ असल्याने रस्त्यावर वर्दळ जास्त होती. मात्र, आरडाओरडा करुन आजूबाजूचे लोक जमा झाले व त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र काही वेळातच कार जळून खाक झाली.

दरम्यान, अग्निशमन दलाला आगीची माहिती मिळताच त्यांचे संपूर्ण पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाली होती.

Web Title: Akola Burning Car nobody is died in Incident