Akola College Row: Seniority List Manipulation Alleged
esakal
अकोला : येथील श्रीमती पी.डी. पाटील समाजकार्य महाविद्यालय, खडकी बु. येथील व्यवस्थापनावर गंभीर आरोप करण्यात आले असून सेवाज्येष्ठता यादीमध्ये जाणूनबुजून फेरफार करून मागासवर्गीय प्रवर्गातील प्राध्यापकाला डावलण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणामुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली असून संबंधित सहयोगी प्राध्यापक डॉ. गणेश शामराव बोरकर यांनी विद्यापीठ स्तरावर सखोल चौकशीची मागणी करत आक्रमक भूमिका घेतली आहे.