स्पर्धापरीक्षेची तयारी करत आहा; मग हे वाचाच

exam.jpg
exam.jpg

तेल्हारा (जि. अकोला) : कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. भारतामधील महाराष्ट्रात त्याचा प्रकोप जास्त असल्याचे जाणवत आहे. राज्याची आर्थिक घडी विस्कटून गेली आहे. त्यामुळे राज्य शासनाने विविध कठोर निर्णय घेतले त्यामध्ये सार्वजनिक आरोग्य वैद्यकीय शिक्षण, औषधी द्रव्य विभाग वगळता इतर विभागातील नोकर भरती रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

विद्यार्थ्यांसह पालकांचे स्वप्न भंगणार
केजी-वन पासून तर पदवीच्या शिक्षणापर्यंत शिक्षण घेत असताना लाखो रुपये खर्च येतो. त्यातल्या त्यात दहावी आणि बारावीच्या शिकवणी वर्गाचा खर्च ताकदीचा बाहेर असतो पण, आपला पाल्य शिक्षण पूर्ण केल्यावर नोकरीला लागेल या भाबड्या आशेने पोट मारून पालक मुलांना शिकवतात पदविका, पदवी धारण करून बीएड करतात. शिक्षकाची नोकरी मिळेल असे स्वप्न पाहतात, जेव्हा ते मुलाखतीसाठी जातात तेव्हा डोनेशनच्या नावाखाली मागितली जाणारी रक्कम माहिती छाती दडपून जाते.

स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागतात स्पर्धापरीक्षेची तयारी घेणाऱ्या शिकवणी वर्गामध्ये प्रवेश घेऊन अभ्यास करतात या मुलांना पालक पैसे पाठवतात. त्यावर ते कसेतरी भागवतात तर, काही मुली अर्धवेळ काम करून अभ्यास करतात, राज्य शासनाने नवीन नोकर भरती रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि या विद्यार्थ्यांच्या व त्यांच्या पालकांच्या पायाखालची वाळू घसरली. आता बंदी केंव्हा उठणार आणी आपणास केव्हा नोकरी मिळेल याची काळजी या विद्यार्थ्यांना लागली आहे.

मुख्य परीक्षा झाली शारीरिक चाचणी लटकली
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक 2019 च्या मुख्य परीक्षेचा निकाल लागला. ही परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांनी शारीरिक चाचणीची सुरुवात केली आहे. परंतु, लॉकडाउनमुळे ही चाचणी रद्द झाली. आता ही चाचणी केव्हा घेतला जाईल याची काही खात्री नाही.

वयाचाही प्रश्‍न होणार निर्माण
सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा पुढील आदेशापर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परंतु, यावर्षी ज्यांचे वय अटी व शर्ती ते समाप्त होणार आहे. त्यांचे काय? असाही प्रश्न विद्यार्थी उपस्थित करीत आहे

पूर्व न्यूज परीक्षा घ्याव्यात
पूर्णपणे उद्‍भवलेल्या आणीक समस्यांपैकी आर्थिक समस्या महत्त्वाची आहे तिजोरीवरील भार कमी करण्यासाठी नोकर भरती भरती रद्द करण्यात आली यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे शासनाने पूर्वनियोजित परीक्षा द्याव्यात अशी मागणी विद्यार्थी होरपळून केले जात आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com