

शाळेतील मुलाच्या त्रासाला कंटाळून एका १३ वर्षीय मुलीने गळफास घेऊन जीवन संपवल्याचा प्रकार समोर आला आहे. काल सायंकाळी अकोल्यातील गिता नगर भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोद केली असून तपास सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. आरोपी मुलगाही अल्पवयीन असल्याची माहिती आहे. या घटनेनं अकोल्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.