कोरोनाचा कायदेभंग पडला महाग, 17 हजार 600 रुपयांचा झाला दंड

akola district murtizapur citizens fine 17 thousand
akola district murtizapur citizens fine 17 thousand

मूर्तिजापूर (जि.अकोला) : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर झालेल्या लॉकडाऊन दरम्यान पाळावयाचे नियम धाब्यावर बसविणाऱ्या 44 ग्राहक व दुकानदारांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारत मुख्याधिकारी विजय लोहकरे यांनी कायदा मोडीत काढणाऱ्यांवर आज चांगलीच जरब बसविली. 17 हजार 600 रूपयांचा दंड ठोठावला आहे.

सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावणारे 38, सोशल डिस्टंसिंग न राखणारे दोन ग्राहक व चार दुकानदार आज मुख्याधिकाऱ्यांच्या कारवाईचे शिकार ठरले. 144 कलमांतर्गत सर्वत्र संचारबंदी लागू आहे. असे असतांनाही नानकराम चेलाराम, समर्थ प्रोव्हीजन्स, लक्ष्मी सुपर शॉपी व सुभाष डेअरी या चार प्रतिष्ठानांविरूद्ध सामाजिक अंतर ठेवण्यात अयशस्वी ठरल्याबद्दल दंडात्मक कारवाई करून त्यांना प्रत्येकी दोन हजार रूपये दंड ठोठावून वसूल करण्यात आला. या चारही ठिकाणी ग्राहकांची प्रचंड गर्दी उसळली होती व सामाजिक अंतर राखण्याची तसदी न घेता व्यवहार सुरू होते. मुख्याधिकारी विजय लोहकरे यांच्या आकस्मिक भेटीदरम्यान ही बाब लक्षात येताच त्यांनी दंडात्मक कारवाई केली. 

ग्राहक डिस्टंसिंग न राखणाऱ्या मोहन किराणा व आशीष गोरले यांना प्रत्येकी एक हजार रूपये दंड ठोठावला. सार्वजनिक ठिकाणी  मास्क न वापरण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. आपल्या शहरातील फेरफटक्यादरम्यान मुख्याधिकाऱ्यांनी हा कायदा मोडणाऱ्या 38 लोकांना प्रत्येकी 200 रूपये दंड ठोठावून जरब बसविली. जे.पी.वाघमारे, अरूण तायडे, देवानंद डोंगरे, सौरभ राठी, रवि लालवाणी, मालाणी, निंघोट, राजकुमार जामनिक, अग्रवाल, अंकुश नितनवरे, सागर अग्रवाल, रवी अग्रवाल, प्रचंड, संतोष गोरले, किशोर राठोड, लतीश कथले, परेश सैजवाणी, श्याम किराणा, श्याम कंकेराल, राठी प्रोव्हीजन यांना मास्क न लावण्याची दंडात्मक शिक्षा भोगावी लागली. कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून जमाव करणे कायद्याने गुन्हा आहे. प्रत्येक ठिकाणी सोशल डिस्टंसिंग राखणे, मास्क लावणे साथरोग कायद्यांतर्गत बंधनकारक आहे.  या बाबत येथील नागरीक व दुकानदार गंभीर असल्याचे दिसत नाही. त्यामुळे मुख्याधिकारी सतत गस्तीवर असतात. यापूर्वी त्यांनी अनिश्चित कालावधीसाठी दोन दुकानांना सील ठोकले आहे. आरोग्य निरिक्षक विजय लकडे, अमोल बेलोटे, प्रसाद सूर्यवंशी, अभियंता पुरुषौत्तम पोटे, मसरूल खान, गजानन पवार, शालीग्राम यदव, पप्पू देशमुख यांच्या पथकाने कारवाईत सहकार्य केले.

आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. सोशल डिस्टंसिंग आवश्यकच आहे. मास्क अनिवार्यच आहे. इतरांनी धडा घ्यावा. ग्राहकांनी विनाकारण मनस्ताप ओढवून घेऊ नये.
-विजय लोहकरे, मुख्याधिकारी, मूर्तिजापूर
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com