डॉ.श्रीकृष्ण राऊत यांना साहित्यव्रती पुरस्कार

akola dr.shrikrishna raut award literature
akola dr.shrikrishna raut award literature

अकोला : संपूर्ण माहाराष्ट्रातचं नव्हे तर सातासमुद्रापार ज्यांच्या कविता आणि गझला जावून पोहोचल्या असे आपल्या अकोल्यातील ज्येष्ठ साहित्यिक, कवी, गझलकार डॉ. श्रीकृष्ण राऊत यांना 13 मार्च, 2020 रोजी पी. आर. पोटे अभियांत्रिकी महाविद्यालयात एका दिमाखदार सोहळ्यात ‘साहित्यव्रती पुरस्कार 2019’ प्रदान करण्यात आला.

या प्रसंगी मातोश्री स्व. सूर्यकांतादेवी रामचंद्रजी पोटे चॅरिटेबल ट्रस्ट अमरावती या ट्रस्ट चे अध्यक्ष मा. रामचंद्रजी पोटे, उपाध्यक्ष मा. दिलीपभाऊ निंभोरकर,डॉ.केशव तुपे (सहसंचालक उ. शि. ) प्रसिद्ध लेखिका, संपादक अरुणाताई सबाणे, डॉ. शोभा रोकडे, डॉ. कुमार बोबडे, उषा राऊत आणि तनया राऊत प्रामुख्याने उपस्थीत होते.


संपूर्ण साहित्य क्षेत्रात सन्मानाचा समजला जाणारा हा पुरस्कार मातोश्री स्व. सूर्यकांतादेवी रामचंद्रजी पोटे चॅरिटेबल ट्रस्ट अमरावती द्वारा राज्यस्तरीय मराठी उत्कृष्ठ वाङ्‌मय निर्मितीसाठी दिला जातो. सदर पुरस्काराचे स्वरुप रोख पुरस्कार, शाल-श्रीफळ, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे आहे. या पुरस्काराचे परिक्षण अमरावती मधील समीक्षक, कवी, कथाकार यांनी केले असून, त्यामध्ये डॉ.अशोक पळवेकर, डॉ. अंबादास घुले, प्रा. कल्पनाताई देशमुख, डॉ. माधुरी भटकर, डॉ. सुनंदा गडकर, आशा फुसे, पुष्पाताई साखरे यांनी केले. गेल्या 4 दशकांपासून ही जास्त कालावधी डॉ. श्रीकृष्ण राऊत यांनी साहित्यिक, कवी, गझलकार म्हणून आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. त्यांची अनेक पुस्तके प्रसिध्द आहेत. अनेक नामवंत पुरस्काराचे ते मानकरी ठरलेले आहेत. अमरावती व नागपूर विद्यापीठाच्या अभ्सासक्रमात त्यांच्या कविता अभ्यासायला आहेत. अनेक मराठी चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले आहे.

श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती निर्मित, राजदत्त दिग्दर्शित डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या जीवन-कार्यावर आधारित ‘ज्ञानगंगेचा भगीरथ’ या चित्रपटाकरिता पटकथा, संवाद, गीत लेखन त्यांनी केले आहे. त्यांच्या गुलाल आणि इतर गझला या गझलसंग्रहाची दुसरी आवृत्ती नुकताचं प्रकाशित झाली आहे. दिव्यांग बांधवांकरीता ‘चार ओळी तुझ्यासाठी’ ब्रेल लिपीत प्रकाशित आहे. या पुरस्कारामुळे त्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.संपूर्ण साहीत्य क्षेत्रातुन त्यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.अशा व्यक्तीचा सन्मान ही आपल्या अकोलेकरांसाठी अभिमानाची बाब आहे असे गौरवोद्गार डॉ.. एम. आर, इंगळे यांनी त्यांचे अभिनंदन करतांना व्यक्त केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com