शेतकरी महिलांनी उभारली शेतमाल प्रक्रिया उद्योगाची चळवळ! नवनवीन पदार्थांची होते निर्मिती आणि विक्रीही

akola Farmer processing industry movement started by women farmers! There was also the production and sale of new products
akola Farmer processing industry movement started by women farmers! There was also the production and sale of new products

अकोला  ः ‘कच्चा माल मातीच्या भावे, पक्का होतास चौप्पटीने घ्यावे, मग कैसे सुखी व्हावे ग्रामजन, पिकवुनीया उपाशी’, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहलेली ग्रामगीता भूमिपुत्रांना अर्पण करतांना जो संदेश दिला त्या धरतीवर, बाहदरपुर व कौलखेड जहांगीर येथील महिलांनी शेतमाल प्रक्रिया उद्योगाची चळवळ उभारली आहे.

शेतमालाचे उत्पादन शेतातून तयार झाले की बाजारात भाव पडतात म्हणून, शेतीतील कच्च्या मालाला बाजारात किंमत मिळत नाही. सरकार सुद्धा देत नाही आणि मिळूनही देत नाही. अशा परिस्थितीत शेतकरी आर्थिकदृष्ट्या खूप खचत चालला आहे. कर्जबाजारी होत आहे. शेतमालाचे उत्पादन वाढत असतांना आत्महत्या सुद्धा वाढत आहेत. या परिस्थितीवर मात करण्यासाठी कौलखेड जहांगीर व बाहदरपुर येथील शेतकरी महिलांनी शेतीमालालावर प्रक्रिया करण्याची नाव्यन्यपुर्ण एक चळवळच गावातच उभी केली असून, शेतकरी महिला गटाचा एक संघ उभा केला आहे. प्रत्येक गटाला त्याच्या भांडवलानुसार व युक्तीच्या कल्पनेने सुचेल अशा शेतमालाची प्रक्रियेकरीता नवीन तंत्रज्ञानाची जोड देऊन नवनवीन प्रयोग करून बाजारात आपली चव कशी विकता येईल, या आशेने चवदार पदार्थ तयार करण्याचा मानस महीला बचत गटांनी व्यक्त केला आणि कामालाही लागल्या आहेत.

असा घेऊ बाजारातील स्पर्धेत सहभाग
प्रक्रिया केलेल्या मालाची विक्री आलेल्या मागणीनुसार करून, मागणी प्रमाणे बाजारात सर्वच पदार्थ विक्रीकरीता उपलब्ध करून व आकर्षक आणि दर्जेदार पॅकिंगसह मार्केटिंग करून, बाजारातील स्पर्धेत सहभागी होऊ, असा निर्धार या महिलांनी व्यक्त केला आहे.

दरमहाच्या बचतीतून उभारले भांडवल
गेल्या दशकापासून सातत्याने या महिल्यांनी दरमहा ५० ते १०० रूपये बचत करून स्वतःच भांडवल निर्माण केले. त्यातूनच त्यांनी अंतर्गत कर्ज पुरवठा केला आणि प्रत्येक महिलेने आवडीनुसार एक-एक व्यवसायाची निवड करून तो चांगला चालवत आहेत. त्यामध्ये कटलरी, लाँड्री, शेळीपालन, शेवयांची मशिनव्दारे शेवया तयार करून विकणे, शिलाई मशीनद्वारे कपडे शिलाई, हातावरच्या शेवया, कुरड्या, पापड, सरगुंडे बटुया, संयुक्तपणे मल्टीगेन आटा, सुगर फ्री दशमी, अशा अनेक व्यवसायाला आपापल्या परीने चालना देत या बचत गटांनी आर्थिक सक्षमतेची दिशा निश्चित केली असून गावातच रोजगार निर्माण केला आहे.

...तर मिळेल शास्वत रोजगार
जवळपास १५ शेतकरी बचत गटांच्या दोनशेहून अधिक महिला, आधुनिक किसान प्रोड्यूसर्स कंपणी कौलखेड जाहाँगीर यांचे संचालक मंडळ व गावातील शेतकरी, शेतमजूरांचा या चळवळीत सहभाग आहे. शेतकरी गटाच्या सर्व महिलांना शास्वत रोजगार मिळून देऊ शकते. त्यासाठी तालुका व जिल्हा पातळीवर या गटांना काम करण्याची संधी जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा वंदनाताई जानोरकर व निलीमाताई महल्ले यांनी सर्व शेतकरी महिलांच्या वतीने व्यक्त केली आहे. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com