Akola: पोलीसांच्या नाकर्ते पणाला वैतागलेल्या शेतकऱ्यांनी केला रास्ता रोको

सदरहु घटनेचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेले पत्रकार यशवंत हिवराळे यांना छायाचित्रण करण्यास मज्जाव करुन पोलीस उपनिरीक्षक तडसे यांनी उध्दटपणाची वागणुक दिली या घटनेचा मालेगाव तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. अकोला -हैद्राबाद मार्गा वरील वाहतूक दिड तास ठप्प... शेतकऱ्यांनी रस्त्यावर टायर जाळून केला संताप व्यक्त
Akola police
Akola policesakal

मालेगाव - शेती उपयोगी साहित्य चोरीला गेल्याची तक्रार देण्यासाठी पोलिस स्टेशनला गेलेल्या शेतकऱ्यांना समाधान कारक वागणूक न मिळाल्याच्या निषेधार्थ मालेगाव तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील शेतकऱ्यांनी आज ता १० रोजी अकोला- हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील

रिधोरा फाटा नजीक तब्बल दोन तास रास्ता रोको केला सोबतच रस्त्यावर टायर जाळून पोलिस प्रशासना विरुद्ध रोष व्यक्त केला घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन शेतकऱ्यांना ताब्यात घेतले आहे.

Akola police
Pune : नदीपात्रातील पाणी संपल्यानंतर बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्याची मागणी

मालेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मौजे ब्राह्मणवाडा येथील एकनाथ हरिभाऊ नागरे यांच्या सह गावातील इतर चार शेतकऱ्यांच्या घरा समोरील शेती उपयोगी सहा मोटार पंप संच चोरीला गेल्याची घटना ९ एप्रीलच्या रात्री दरम्यान घडली.

सदरहू घटनेची फिर्याद देण्या साठी ब्राह्मणवाडा येथील एकनाथ हरिभाऊ नागरे व विकास विश्वनाथ नागरे यांच्या सह इतर काही शेतकरी १० एप्रील रोजी सकाळीच मालेगाव पोलिस स्टेशनला गेले असता पोलिस प्रशासनां कडून अपेक्षित सहकार्य व समाधान कारक वागणूक न मिळाल्यानेच रिधोरा फाटा नजीक रस्त्यावर टायर जाळून चक्का जाम केल्याची प्रतिक्रिया'

Akola police
Mumbai: महारेराकडून जप्त मालमत्तेचा लिलाव

ब्राह्मणवाडा येथील एकनाथ हरिभाऊ नागरे यांनी रास्ता रोको दरम्यान प व्यक्त केली रस्त्यावर टायर जाळून शेतकरी वाहनां समोर उभे ठाकल्याने जवळपास दिड तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांब लचक रांगा लागल्याने वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागला घटनेची माहिती मिळाल्या नंतर ,

तब्बल तासाभर विलंबाने दाखल झालेल्या पोलीसांनी आंदोलकांना धक्का बुक्की करत ताब्यात घेतले यावेळी संतापलेल्या पोलिसांनी घटनेचे छायाचित्रण करणा-या नागरीकांचे मोबाईल हिसकावून ताब्यात घेतल्याने पोलीसांप्रती जनतेतून संताप व्यक्त केला गेला सदरहू प्रकरणी आंदोलका विरुद्ध कारवाईची प्रक्रिया मालेगाव पोलिसां कडून सुरु होती...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com