अकोला - उष्णतेने किडणीस्टोनच्या रुग्णांमध्ये वाढ

अनुप ताले
शुक्रवार, 18 मे 2018

अकोला - जिल्ह्यातील रुग्णालयात खारपानपट्टा नसतानाही प्रत्येक तीन घरे सोडून एका व्यक्तीला किडणीस्टोनचा त्रास होत असल्याचे समोर आले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि अचानक किडणीस्टोनचा त्रास होत असल्याने, जिल्ह्यात 'किडणीस्टोन'चा अट्याकच आल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे.

अकोला - जिल्ह्यातील रुग्णालयात खारपानपट्टा नसतानाही प्रत्येक तीन घरे सोडून एका व्यक्तीला किडणीस्टोनचा त्रास होत असल्याचे समोर आले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि अचानक किडणीस्टोनचा त्रास होत असल्याने, जिल्ह्यात 'किडणीस्टोन'चा अट्याकच आल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे.

अचानक उद्‍भवलेल्या या समस्येचे कारण काय याविषयी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांच्याशी चर्चा केली असता, केवळ शरीरात पाण्याचा अभाव या समस्येचे मुळ असल्याचे त्यांनी सांगितले. तापमान ४५ अंशापार गेल्याने, तिव्र उष्णता जाणवते व शरीरातील पाणी कमी होते. अशा वातावरणात नियमित पेक्षा दीड ते दुप्पट पाणी शरीरात जाणे अपेक्षित असते. मात्र तसे होत नसल्याने, पिवळी लघवी होणे, जळजळ होणे, थकवा येणे, मळमळ होणे, पोट दुखणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे किडणीस्टोनची समस्या उद्‍भवते. 

याव्यतिरिक्त नियमित व गोळ्या-औषधी सेवन करणाऱ्यांनाही किडणीस्टोन होऊ शकतो. पाण्यात मोठ्या प्रमाणात क्षार असल्यास काही प्रमाणात ही समस्या जाणवते, मात्र कुटुंबातील एकाला किडणीस्टोन होतो व इतराना होत नाही याचा अर्थ इतरांच्या तुलनेत त्या व्यक्तीच्या शरीरात पाण्याची कमतरता असल्याचे ते लक्षण असल्याचे स्पष्ट करत, जास्तीत जास्त पाणी पिणे हा एकमेव यावर उपाय असल्याचे त्यांनी सांगितले.

अॅलोपॅथी होमिओपॅथी, आयुर्वेदीक उपचाराचा संभ्रम
किडणीस्टोन झाल्यास पोटात असह्य वेदना, मळमळ, छाती, कमरेचे दुखणे हे अतिशय त्रासदायक होते. अशावेळी ज्या उपचाराने लवकरात लवकर आराम मिळेल तो घेण्यासाठी लोक सरसावतात. मात्र, काहीजण अॅलोपॅथी, काहीजण होमिओपॅथी तर काहीजण आयुर्वेदीक उपचारयासाठी लाभदायी असल्याचे खात्रीने सांगतात. त्यामुळे नेमका कोणत्या पद्धतीचा उपचार घ्यावा, अशी संभ्रमावस्था नागरिकांमध्ये दिसून येत आहे.

Web Title: Akola - Growth in Kidneystone patients