esakal | बापरे! मनपा हद्दीत झाले प्रतिबंधित क्षेत्राचे अर्धशतक; एकाच दिवसाच सहा नवीन प्रतिबंधित क्षेत्राची भर
sakal

बोलून बातमी शोधा

akola Half a century of restricted area was added in the municipal limits, six new restricted areas were added in a single day

महानगरपालिका क्षेत्रात कोरोना बाधिक रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच. त्यामुळे मनपा हद्दीत प्रतिबंधित क्षेत्राचे अर्धशतक मंगळवारी पूर्ण झाले. एका दिवसातच सहा नवीन कन्टेंमेन्ट झोनची नोंद शहरात झाल्याने आता एकूण ५१ प्रतिबंधित क्षेत्र आहे.

बापरे! मनपा हद्दीत झाले प्रतिबंधित क्षेत्राचे अर्धशतक; एकाच दिवसाच सहा नवीन प्रतिबंधित क्षेत्राची भर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला  : महानगरपालिका क्षेत्रात कोरोना बाधिक रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच. त्यामुळे मनपा हद्दीत प्रतिबंधित क्षेत्राचे अर्धशतक मंगळवारी पूर्ण झाले. एका दिवसातच सहा नवीन कन्टेंमेन्ट झोनची नोंद शहरात झाल्याने आता एकूण ५१ प्रतिबंधित क्षेत्र आहे.

अकोला महानगरपालिका हद्दीतील कोरोना बाधित रुग्णांची संख्या त्रिशतकाकडे वाटचाल करीत आहे. वाढत्या रुग्ण संख्येसोबच अकोला शहरातील प्रतिबंधित क्षेत्रातही वाढ होत आहे. त्यामुळे समूह संग्रमनाने हातपाय पसरविण्यास सुरुवात केली असल्याचे संकेत आहे. सोमवारपर्यंत अकोला शहरातील प्रतिबंधित क्षेत्राची संख्या 44 झाली होती.त्यात मंगळवारी एकाच दिवशी सहा नवीन प्रतिबंधित क्षेत्राची भर पडली आहे. रामदासपेठ, आदर्श कॉलनी, व्हीएचबी कॉलनी रतनलाल प्लॉट आदींसह जुने शहरताल सोनटक्के प्लॉटचाही समावेश आहे.

हेही वाचा - हृदयद्रावक सुखी संसार अचानक विस्कटला अन् विवाहितेसह दोन चिमुकल्यांनी विहिरीत...

हे आहेत शहरातील प्रतिबंधित क्षेत्र
बैदपुरा, अकोटफैल, सिंधी कॅम्प, कृषिनगर, खैर मोहम्मद प्लॉट, मेहरेनगर डाबकीरोड, कमलानगर वाशीम बायपास, रवीनगर सुधीर कॉलनी, शिवर, शिवनी, जयहिंद चौक, शंकरनगर अकोटफैल, गुलजारपुरा आरपीटीएस रोड, न्यू राधाकिसना प्लॉट, माळीपुरा, अगरवेस राजपुरा, आळशी प्लॉट, तारफैल, अक्कलकोट हरिहरपेठ, बापूनगर, रामनगर म्हाडा कॉलनी, गडंकी आरपीटीएसरोड, भवानीपेठ तारफैल, आझाद कॉलनी, आंबेडकरनगर सिव्हिल लाईन्स, मोठी उमरी, तकीया अगरबेस, खिडकीपुरा जुने शहर, खडकी, जीएमसी क्वॉटर गौरक्षण रोड, शास्त्रीनगर, पोलिस क्वॉटर रामदासपेठ, अंसार कॉलनी, राजपुतपुरा, नायगाव, लक्कडगंज रोड, आनंदनगर दमानी हॉस्पिटल, सावंतवाडी रणपिसेनगर, डाबकी व्हिलेज डाबकी रोड, गीतानगर जुनेशहर, रेल्वे क्वॉटर जठारपेठ, संतोषी माता चौर मालधक्का रोड, आदर्श कॉलनी, कच्ची खोली सिंधी कॅम्प, सोनटक्के प्लॉट जुने शहर, अकोली गाव जुने शहर, सावतराम मील दगडी पूल, व्हीएचबी कॉलनी रतनलाल प्लॉट.

loading image
go to top