esakal | देशातील आरोग्य यंत्रणा पडू शकते अपुरी 
sakal

बोलून बातमी शोधा

akola health system in the country may be inadequate

वेगवेगळ्या खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आवाहन माध्यमातून समोर येत आहे, त्यात कोरोनासारखी साथ झपाट्याने पसरल्यास आपल्या देशातील आरोग्य यंत्रणा अपुरी पडू शकते, त्यामुळे तुम्हीच तुमची काळजी घ्या, असा सल्ला दिला जात आहे. हे आवाहन वास्तवाला धरून आहे.

देशातील आरोग्य यंत्रणा पडू शकते अपुरी 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : कोरोनासारख्या अचानक अालेल्या महाभयंकर आजारापुढे अमेरिका, इटलीसारखी प्रगत राष्ट्रे अपुऱ्या वैद्यकीय यंत्रणेमुळे हतबल झाली आहेत. कोरोनाचा प्रसार झाल्यास भारताच्या लोकसंख्येचा आणि उपलब्ध सामग्रीचा विचार केल्यास अनेकांना रुग्णालयापर्यंतही आणणे जिकिरीचे ठरेल. अकोला जिल्ह्याची लोकसंख्या १८ लाख, १४ हजार असून, कोरोनावरील उपचारासाठी जिल्ह्यात केवळ दोन ठिकाणी आयसोलेशन वॉर्ड तयार करून १८० बेडची सोय करणे प्रशासनाला शक्य झाले आहे. त्यात शासकीय रुग्णालयांमध्ये एकूण १७ व्हेंटिलेटर उपलब्ध असून, परिस्थिती हाताबाहेर गेल्यास यंत्रणेची काय दशा होऊ शकते, याचा अंदाज न घेतलेला बरा, अशी स्थिती आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकानेच काळजी घेण्याची गरज आहे.


वेगवेगळ्या खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आवाहन माध्यमातून समोर येत आहे, त्यात कोरोनासारखी साथ झपाट्याने पसरल्यास आपल्या देशातील आरोग्य यंत्रणा अपुरी पडू शकते, त्यामुळे तुम्हीच तुमची काळजी घ्या, असा सल्ला दिला जात आहे. हे आवाहन वास्तवाला धरून आहे. अकोला जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा आपल्या परीने जरी काम करीत असली तरी परिस्थिती हाताबाहेर जर गेली तर यंत्रणा अपुरी पडू शकते. एकाचवेळी मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण वाढल्यास उपचार करणे क्षमतेबाहेरचे ठरेल. जिल्हा शासकीय रुग्णालयांमध्ये १७ व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत.

वैद्यकीय सूत्राच्या माहितीनुसार कोरोनाच्या प्रत्येक रुग्णाला व्हेंटिलेटर लावण्याची आवश्यकता नाही. मात्र, १०० पैकी ५ रुग्णांना व्हेंटीलेटर आवश्यक आहेत. देशात आणि महाराष्ट्रातही कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होतो आहे. अकोला जिल्ह्यात अद्याप जरी एकही रुग्ण पॉजिटिव्ह जरी नसला तरी अकोलेकरांनी लॉकडाऊनची सिमारेषा तोडल्यास ही शक्यता पुसण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. दरम्यान यामुळे नागरिकांनीही अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.

आयसोलेशन वार्डात १३२ खाटा
सर्वोपचार रुग्णालयात तयार करण्यात आलेल्या आयसोलेशन वार्डात १३२ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. तर दुसऱ्या नवीन इमारतीमध्ये १८० खाटांचे दुसरे आयसोलेशन वार्ड तयार केले जात आहे. त्यामध्ये १८० खाटांची उपलब्धता केली जाणार आहे. पुढील सात ते आठ दिवसांत हे दुसरे आयसोलेशन वार्ड कार्यान्वींत केले जाणार आहे.

१७ व्हेंटीलेटर !
सर्वोपचार रुग्णालयाच्या अतिदक्षता कक्षात जवळपास २० व्हेंटीलेटर आहेत. त्यातील काही व्हेंटीलेटर बंद पडल्याने येथे केवळ १७ व्हेंटीलेटर सुरळीत सुरू आहेत. त्यामुळे अतिदक्षता कक्षात रुग्ण व्हेंटीलेटरच्या प्रतीक्षेत असतात. शंभरपैकी ५ टक्के लोकांना जरी व्हेंटीलेटर लावण्याची गरज असते असे जरी म्हटले जात असले तरी परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढू शकतो.

मूर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयात ५० खाटा राखीव
मूर्तिजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात ५० खाटांचे आयसोलेशन वॉर्ड कार्यान्वीत करण्यात आले आहे. तर ५० खाटांचे साधे बेडही राखीव करण्यात आले आहेत.

चार व्हेंटीलेटरची प्रतीक्षा कायम!
सध्यस्थितीत सर्वोपचार रुग्णालयात १७ व्हेंटीलेटर उपलब्ध आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकही कोरोनाचा बाधित रुग्ण आढळला नसल्याने परिस्थिती नियंत्रणात आहे. परंतु, रुग्णांची संख्या वाढल्यास व्हेंटीलेटरची आवश्यकता भासणार आहे. त्या अनुषंगाने आरोग्य विभागातर्फे चार नवीन व्हेंटीलेटरची मागणी प्रशासनाकडे केली होती. परंतु, अद्यापही नवीन व्हेंटीलेटर प्राप्त झाले नाहीत.

कोरोना व्हायरस बाधीत रुग्णांसाठी सर्वोपचार रुग्णालयात नवीन आयसोलेशन वॉर्ड कार्यान्वीत करण्यात आला आहे. यासोबत नवीन इमारतीत दुसरा आयसोलेशन वॉर्ड सुरू करण्यात येणार आहे. व्हेंटीलेटरची उपलब्धता गरजेपुरती आहे.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला. 

loading image