Akola Municipal Election
esakal
श्रीकांत राऊत
अकोला : महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने उमेदवार निवडीत धक्कादायक रणनीती अवलंबल्याचे स्पष्ट झाले आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजप तब्बल ६६ जागांवर आपले उमेदवार रिंगणात उतरवत असून, युतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडे उर्वरित १४ जागा देण्यात आल्या आहेत. अखेरच्या क्षणी भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून तब्बल ४० टक्के नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आल्याने अनेकांचा पत्ता कट झाला आहे. भाजपच्या या रणनीतीमुळे चर्चांना तोंड फुटले आहे.