Akola Minor Girl Missing Case
esakal
चान्नी, ता. २ : चान्नी पोलिस ठाणे हद्दीतील एका गावात अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळविल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मुलीच्या आईने चान्नी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.