esakal | चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला बत्त्याने ठेचून मारले
sakal

बोलून बातमी शोधा

akola news, Doubt on character; The husband crushed his wife with a candle

चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीची खलबत्त्याने ठेचून हत्या केल्याची घटना सोमवारी (ता.११) पहाटे पातुर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आलेगाव जांब मार्गावरील आदर्श गोसेवा गौरक्षणजवळ उघडकीस आली.

चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला बत्त्याने ठेचून मारले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चतारी (जि.अकोला)  : चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीची खलबत्त्याने ठेचून हत्या केल्याची घटना सोमवारी (ता.११) पहाटे पातुर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आलेगाव जांब मार्गावरील आदर्श गोसेवा गौरक्षणजवळ उघडकीस आली.

बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील जनुना येथील पती-पत्नी आपल्या दोन लहान चिमुकल्यांसह कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी आलेगाव जांब मार्गावरील एका शेतात वास्तव्यास होते. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पती-पत्नीमध्ये नेहमी विवाद उद्भवायचे. शेवटी हा वाद जीवावर उठला. रविवार (ता.१०) मध्यरात्री पतीने पत्नीची खलबत्त्याने ठेचून हत्या केल्याची घटना सोमवारी (ता.११) पहाटे उघडकीस आली. पत्नीची हत्या करून पतीने स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. जिजाबाई मेटांगे (२५) असे मृतक महिलेचे नाव आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

घटनेची माहिती मिळताच चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश वनारे  सोमवारी सकाळीच घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे पाठविण्यात आले आहे. तर आरोपी पती मनोहर हिरामण मेटांगे यांनी डोक्यावर वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तोही जखमी झाला. त्याला उपचारासाठी सर्वोपचार रूग्णालय अकोला येथे हलविण्यात आले आहे.

तसेच त्याच्यावर कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार वनारे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक रामराव राठोड करीत आहे. याप्रकरणी बाळापूरचे एसडीपीओ रोहिणी सोळंके यांनी सुद्धा घटनास्थळाला भेट दिली आहे.