तीन मुलांची हत्या करून वडीलांचाही आत्महत्येचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

अकोला - बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या धोतर्डी येथे वडिलांनीच स्वतःच्या तीन मुलांची हत्या करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना बुधवार (ता.९) रात्री 8  वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

धोतर्डीत येथे वडिलांनी आपल्या मुलांना आधी विष पाजून ठार करण्याचा प्रयत्न केला असावा असा अंदाज आहे. मात्र, त्याचा फारसा परिणाम न झाल्याने दोन मुलांना शॉक देऊन ठार केले तर एकाच्या डोक्यात घरातील वरवंट्याने घाव करून ठार केले. त्यानंतर स्वत:ला इजा करून गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या संपूर्ण प्रकरणात तिन्ही मुलांचा मृत्यू झाला असून वडील गंभीर जखमी असल्याचे समजते. विष्णू इंगळे असे या वडिलांचे नाव असून मृतकांमध्ये अजय, मनोज आणि शिवानी या तीन मुलांचा समावेश आहे.  आज सायंकाळच्या सुमारास झालेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या संपूर्ण घटनेमागचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही.

Web Title: akola news father also attempted suicide by killing three children