अकोलाः दोन हॉटेल व्यावसायिकांना ३५ हजारांचा दंड

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

शहर संपूर्णपणे स्वच्छ करण्यासाठी शहरातील प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरात व प्रतिष्ठानात ओला व सुका कचरा वेगवेगळ्या डस्टबीनमध्ये गोळा करून शहरात इतरत्र न टाकता मनपाच्या कचरा घंटा गाडीमध्येच टाकणे आवश्यक आहे.

अकोलाः शहर स्वच्छतेसाठी कचरा मनपाच्या कचरा गाड्यांमध्ये टाकण्याचे आवाहन महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आले. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून हॉटेलमध्ये डस्टबीन न ठेवणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांना ३५ हजार रुपये दंड आकारण्यात आला. 

शहर संपूर्णपणे स्वच्छ करण्यासाठी शहरातील प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरात व प्रतिष्ठानात ओला व सुका कचरा वेगवेगळ्या डस्टबीनमध्ये गोळा करून शहरात इतरत्र न टाकता मनपाच्या कचरा घंटा गाडीमध्येच टाकणे आवश्यक आहे. शहरात जनजागृती रॅलीच्या माध्यमातून तसेच १५ सप्टेंबर ते २ आक्टोबरपर्यंतच्या स्वच्छता हीच सेवा या कार्यक्रमांतर्गत अकोला महानगरपालिका क्षेत्रातील संपूर्ण भागात महानगरपालिका प्रशासनाव्दारे जनजागृती करण्यात आली आहे.

आजही शहरातील काही नागरिकांव्दारे आपल्या व्यावसायिक प्रतिष्ठाने व घरांमध्ये निघणारा ओला व सुका कचरा वेगवेगळा गोळा न करता व शहरातील खुल्या जागेवर टाकत असल्याने शहर स्वच्छ करण्याच्या कामामध्ये अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे प्रतिष्ठानात डस्टबीन न ठेवल्यामुळे मनपा आयुक्त अजय लहाने यांच्या आदेशान्वये दक्षिण झोन अंतर्गत मूर्तीजापूर रोडवरील होटेल तुषारच्या संचालकांवर २५ हजार रुपये व रामलता बिजनेस सेंटरमधील हाॅटेल अलबेला यांच्या संचालकांवर १० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.  

Web Title: Akola news fine on hotels