अकोला: एेन दिवाळीत तुपात भेसळ 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

डेअरीवरून घेत होते बेरी 
डालडा मिश्रीत तुप बनविण्यासाठी हे नागरिक डेअरीमधून तुपाची बेरी विकत घेत होते. ती बेरी व विकत आणलेले डालड्याचे पाकीट एकत्र करून त्याला उकळण्यात येत होते. त्याचे मिश्रण विकण्यात येत होते. यामुळे त्या डालड्याला तुपाचा सुगंध येत होता. ते तुप म्हणून ग्राहकांना विकल्या जात होते. 

अकोला : वनस्पती तुपाचे (डालडा) मिश्रीन करून तुप विक्री करणाऱ्यांचा डाव उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने सोमवारी उधळून लावला. पोलिसांनी यामध्ये २०० किलो डालडा मिश्रीत तुपासह ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यातील दहा जणांना ताब्यात घेतले असून, एक जण फरार झाला. आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. हे प्रकरण पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाकडे वळते करण्यात आले. 

शहर पोलिस उपअधीक्षक उमेश माने पाटील यांच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली. शिवसेना वसाहतीमधील गुरू नगर व कमला नेहरूनगरमध्ये डालडा व तुपाची बेरी मिळून तुप विक्री करीत आहे. मिश्रीत तुप हे नागरिकांना विकणाऱ्यांची टोळी येथे असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी दोन्ही ठिकाणी छापा टाकला. या छाप्यामध्ये पोलिसांनी बनावट तुप १७५ किलो २६ हजार २५० रुपये, डालडा पाकीट १६० ववापरणण्ययात येणारी बेरी ४० किलो दोन हजार रुपये, गॅस सिलिंडर दोन हजार ८०० रुपये, गॅस शेगडी ५०० रुपयांसह इतर साहित्य असे एकूण ५६ हजार २० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये पोलिसांनी राजू अमरू गिरी, कन्हैयागीर रूपगीर बामने, शाम दत्त गिरी, गुलाब दत्त गिरी, अशोक नारायण गिरी, गजानन नारायण गिरी, नारायण दत्त गिरी यांच्यासह एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. त्यांच्या बापूभाऊ राठोड हा पसार होण्यात यशस्वी झाला. हे सर्व आरोपी हिंगोली जिल्ह्यातील औंढा व बुलडाणा जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी हे सर्व साहित्य जप्त करून जुने शहर पोलिस ठाण्यात आले. यानंतर हे प्रकरण अन्न व औषध प्रशासन विभागाच्या स्वाधीन करून देण्यात आले आहे. जुने शहर पोलिसांनी यामध्ये कुठलाच गुन्हा दाखल केला नाही, हे विशेष. ही कारवाई शहर पोलिस उपअधीक्षक उमेश माने पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक बाळकृष्ण पवार, श्रीकृष्ण इंगळे, रवी शिरसाट, विठ्ठल विखे, दीपक किल्लेदार, मिथिलेश सुगंधी, महिला पोलिस कर्मचारी फरजाना यांच्यासह जुने शहर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक नंदकिशोर नागलकर, सहायक पोलिस उपनिरीक्षक श्री. मोरे, पप्पू ठाकूर, दत्ता चव्हाण, विनोद चोरपगार, अनिस, श्री. वाघमारे, संजय जाधव यांनी केली. 

अन्न व औषध प्रशासन विभागाला या कारवाईबाबत माहिती दिली. त्यांनी बनावट तुपाचे सॅम्पल घेतले असून मुद्देमाल सिल केला आहे. तसेच ज्यांना ताब्यात घेतले होते, त्यांना संमस दिले आहे. त्यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिस पुढील कारवाई करतील. 
- नंदकिशोर नागलकर, सहायक पोलिस निरीक्षक, जुने शहर. 

डेअरीवरून घेत होते बेरी 
डालडा मिश्रीत तुप बनविण्यासाठी हे नागरिक डेअरीमधून तुपाची बेरी विकत घेत होते. ती बेरी व विकत आणलेले डालड्याचे पाकीट एकत्र करून त्याला उकळण्यात येत होते. त्याचे मिश्रण विकण्यात येत होते. यामुळे त्या डालड्याला तुपाचा सुगंध येत होता. ते तुप म्हणून ग्राहकांना विकल्या जात होते. 

आधी उघड्यावरच तुप बनवायचे 
डालडा मिश्रीत तुप तयार करण्यासाठी यातीलच काही व्यक्ती भाटे क्लबच्या मैदानावर राहत होते. तिथे उघड्यावर डालडा मिश्रीत बेरीचे तुप बनवून ते विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांच्या चौकशीत समोर आली आहे. 

३०० रुपयांत विकत होते तुप 
डालडा मिश्रीत तुप तयार करून ते ५०० रुपयांचे ग्राहकांना सांगून ३०० रुपयांपर्यंत ते ग्राहकांना विकत होते. कमी भावात आणलेली बेरी व ६० ते ७० रुपयांच्या भाव असे सव्वाशे ते दीडशे रुपयांचे ते ३०० रुपये करीत होते.   

Web Title: Akola news ghee mixing in Akola